ऑनलाईन फ्रॉडसाठी बनावट सिमकार्डचा पुरवठा, ठाणे पोलिसांची मोठी कारवाई

शेअर मार्केटच्या नावाने गुंतवणूक करण्यासाठी सातत्याने फोन करणे आणि  व्हाट्सअ‍ॅप ग्रुपवर जॉईंट होऊन लिंकद्वारे ऑनलाइन फ्रॉड करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
ठाणे:

शेअर मार्केटच्या नावाने गुंतवणूक करण्यासाठी सातत्याने फोन करणे आणि  व्हाट्सअ‍ॅप ग्रुपवर जॉईंट होऊन लिंकद्वारे ऑनलाइन फ्रॉड करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या प्रकरणी अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. ठाणे पोलिसांनी या प्रकरणात केलेल्या कारवाईत बनावट सिम कार्ड पुरवणारी टोळी पकडलीय. या प्रकरणात 3 जणांना अटक करण्यात आली आहे.  त्यांच्याकडून जवळपास प्री अ‍ॅक्टिव्हेटेड 779 मोबाईल सिम कार्ड, 1 लॅपटॉप , 2 वायफाय राऊटर, 50 क्रेडिट- डेबिट कार्ड, 20 चेकबुक आणि रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त केला आहे.

काय आहे प्रकरण?

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करुन श्रीमंत होण्याची अनेकांची इच्छा असते. सामान्यांची ही इच्छा लक्षात घेऊन काही आंतरराष्ट्रीय टोळीनं फसवणूक करण्याचे प्रकार सुरु केले आहेत. बनावट ट्रेंडिंगमध्ये गुंतवणूकदारांना ओढून त्यांच्या खात्यावरील रक्कम ऑनलाईन ट्रान्सफर केली जात असे. त्यांना कोणताही परतावा न देता मोठी फसवणूक केली जात असे. या प्रकरणाच्या अनेक तक्रारींची नोंद पोलिसांकडं करण्यात आली होती. 

( नक्की वाचा : डोंबिवलीतील महिलेला मित्रासोबतची मस्ती नडली, तो वाचला ती मात्र... )
 

या तक्रारीनंतर ठाणे पोलिसांचा तपास सुरु होता. ठाणे पोलिसांनी यामध्ये  आफताब इर्शाद ढेबर (वय 22), मनीषकुमार देशमुख ( वय 27) आणि हाफिज अहमद उर्फ भाईजान (वय 48) यांना अटक केलीय. यापैकी हाफिज हा दिल्लीतील रहिवाशी आहेत.  हे तिघेही  बनावट सीमाकार्ड प्रोव्हायडर असून नागरिकांची फसवणूक करून त्यांच्या नावाने खोटे सिमकार्ड तयार करत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.

( नक्की वाचा : 'इन्स्टा'वर मैत्री, प्रेमाचा बनाव, अश्लील व्हिडिओ, नवी मुंबईत भयंकर घडलं... )
 

या तिघांनी हे सिमकार्ड देशातील हरियाणा , राजस्थान, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, तेलंगणा , गुजरात , केरळ, या राज्यात सिम कार्डची विक्री करत नागरिकांना फसवले आहे. त्याचबरोर 3 हजार सिमकार्डची दुबई, कंबोडिया, चीन या देशांमध्ये विक्री केल्याचंही तपासानंतर समोर आलं आहे. 

Advertisement
Topics mentioned in this article