राहुल कांबळे, प्रतिनिधी
सोशल मीडिया अॅपचा वापर हा मैत्री करण्याबरोबरच फसवणुकीसाठीही मोठ्या प्रमाणात केला जातो. याबाबतच्या अनेक घटना घडल्या आहेत. हे प्रकार सातत्यानं उजेडा आल्यानंतरही त्याचं प्रमाण कमी झालेलं नाही. नवी मुंबईमध्येही एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे प्रकरण?
खारघरमध्ये राहणाऱ्या एका महिलेशी रेहान खान या व्यक्तीनं इन्स्टाग्रामवर मैत्री केली. त्यानंतर दोघांनी एकमेकांशी व्हॉट्सअप नंबर शेअर केले. त्याचबरोबर त्यांचं व्हिडिओ कॉलवर बोलणं सुरु झालं. रेहाननं पीडित महिलेला विश्वास घेऊन तिचा अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड केला.
( नक्की वाचा : डोंबिवलीतील महिलेला मित्रासोबतची मस्ती नडली, तो वाचला ती मात्र...)
रेहाननं हा व्हिडिओ पीडित महिलेला दाखवून 20 हजार रुपयांची मागणी केली. पैसे मिळाले नाहीतर तर मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईंकानं व्हिडिओ दाखवेल अशी धमकी दिली. या धमकीनंतरही पीडितेनं पैसे दिले नाहीत. आरोपी रेहान याने पीडितेचे व्हिडीओ मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईकांना फॉरवर्ड केले. पीडित महिलेनं या प्रकरणात रेहान खान विरोधात खारघर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. खारघर पोलिसांनी याबाबतचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु केला आहे..
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world