Manoj Jarange Patil murder conspiracy : मराठा आंदोलनासाठी मोठं आंदोलन उभं करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात तिसऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. या तिसऱ्या आरोपीचा संबंध बीडमधील बड्या नेत्याशी असल्याचा आरोप केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जालना पोलिसांनी मनोज जरांगे यांच्या हत्येचा कट रचल्या प्रकरणी तिसऱ्या आरोपीला अटक केली आहे. दादा गरुड, अमोल खुणेनंतर आता कांचन साळवीला जालना पोलिसांनी अटक केली आहे.
दादा गरुड आणि अमोल खुणे यांच्याशी कांचन नावाच्या व्यक्तीचा सबंध असून तो धनंजय मुंडे यांचा PA असल्याचा मनोज जरांगे यांनी आरोप केला होता. त्यामुळे मनोज जरांगे यांच्या हत्येचा कट रचल्या प्रकरणात धनंजय मुंडेंवर मोठे आरोप केले जात आहे.
नक्की वाचा - Beed News: 'संतोष भैय्यानंतर तुझाच नंबर होता'; मनोज जरांगेंचे सहकारी काळकुटेंना जीवे मारण्याची धमकी
तिसरा आरोपी अटकेत, धनंजय मुंडे निशाण्यावर...
मनोज जरांगे यांच्या हत्येचा कट रचल्या प्रकरणी तिसऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे.कांचन साळवी असं पोलिसांनी अटक केलेल्या तिसऱ्या आरोपीचं नाव आहे. त्याला बीडमधून अटक करण्यात आली आहे. दादा गरुड, अमोल खुणे नंतर आता कांचन साळवीला जालना पोलिसांकडून अटक करण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे. दादा गरुड आणि अमोल खुणे यांच्याशी कांचन साळवी नावाच्या व्यक्तीचा सबंध असल्याचा आणि तो धनंजय मुंडे यांचा पीए असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला होता. दरम्यान साळवी याला अटक केल्यानं आता या प्रकरणात साळवी पोलिसांकडे काय खुलासे करतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
