जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातल्या दहिवद फाट्याजवळ भीषण अपघात झाला आही. खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या मारुती व्हॅन व दोन दुचाकींची धडक होवून हा अपघात झाला. हा अपघात इतका मोठा होती की 3 जण जागीच ठार झाले आहेत. तर 4 जण गंभीर जखमी झाले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
शनिवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातात ठार झालेले तीनही जण चोपडा येथील असल्याची माहिती समोर आली आहे. चोपडा येथून दोन दुचाकी वर 6 जण कॅटर्सच्या कामासाठी मंगरूळ येथे जात होते. त्याच वेळी समोरून येणाऱ्या मारुती व्हॅनवर दोन्ही दुचाकी धडकल्या.
ट्रेंडिंग बातमी - एकनाथ खडसेंचे फडणवीसांबाबत मोठे वक्तव्य, मोठी घडामोड होणार?
दोन्ही दुचाकी व्हॅनवर धडकल्याने हा अपघात झाला आहे. दुचाकीस्वारहे वेगात होते. शिवाय मारूती व्हॅनही वेगात होती. त्यामुळे यांची जोरदार टक्कर झाली. त्यात तीन जण जागीच दगावले. त्यांना तातडीने जवळच्या रूग्णालयात नेण्यात आले. त्याच वेळी त्यांना मृत म्हणून घोषीत करण्यात आली. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांचीही स्थिती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.
ट्रेंडिंग बातमी - विधानसभेचे अध्यक्षपद शिवसेना -राष्ट्रवादीला नाहीच? भाजपचा उमेदवारही ठरला?
अमळनेर तालुक्यातील दहिवद फाट्याजवळ हा अपघात झाला. अपघात झाल्यानंतर स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीनेच जखमींना तातडीने अमळनेर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे जखमींचे प्राण वाचण्यास मदत झाली आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. शिवाय अपघात कोणामुळे झाला, कोणाची चुक होती याची चौकशी केली जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world