जाहिरात

मित्राला हळद लावून घरी निघाले, वाटेत भयंकर घडलं, भीषण अपघातात तिघांचा मृत्यू

जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात भरधाव कार झाडावर धडकल्याने भयंकर अपघात झाला. या दुर्घटनेत तीन जण जागीच ठार झाले आहेत

मित्राला हळद लावून घरी निघाले, वाटेत भयंकर घडलं,  भीषण अपघातात तिघांचा मृत्यू

मंगेश जोशी, जळगाव: जळगावमधून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात भरधाव कार झाडावर धडकल्याने भयंकर अपघात झाला. या दुर्घटनेत तीन जण जागीच ठार झाले आहेत. हळदीचा कार्यक्रम आटोपून परतत असताना ही मोठी दुर्घटना घडली. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातल्या सावदा पिंपरुड रस्त्यावर भरधाव कार झाडावर धडकून भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत 3 जण जागीच ठार झाले असून 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. मित्राच्या हळदीचा कार्यक्रम आटोपून रावेर कडे जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार झाडावर धडकल्याने ही भयंकर घटना घडली. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

 शुभम सोनार, मुकेश रायपुरकर व केशव भोई असे या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. तर गणेश भोई अक्षय उन्हाळे व विकी जाधव हे तीन मित्र गंभीर जखमी झाले आहेत. ही अपघाताची घटना इतकी भयंकर होती की, गाडीचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. 

भुसावळ येथे मित्राच्या बहिणीचा हळदीचा समारंभ असल्याने सर्व मित्र कारद्वारे रावेर वरून भुसावळ येथे गेले होते. हळदीचा कार्यक्रम आटोपून रात्री एक वाजेच्या सुमारास रावेर कडे परतत असताना सावदा - पिंपरुड दरम्यान कार चालवत असलेल्या तरुणाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने भरधाव कार झाडावर आदळल्याने हा भीषण अपघात झाला आहे.

या अपघातानंतर मोठा आवाज झाल्याने परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केले तसेच या अपघाताबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन स्थानिकांच्या मदतीने जखमींना तातडीने रुग्णालयात हलवले मात्र गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने जळगाव जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.

या अपघाताची माहिती मिळतात रावेर शहरात एकच खळबळ उडाली असून एकाच वेळी तीन मित्रांचा मृत्यू झाल्याने रावेर शहरावर शोककळा पसरली आहे . तर जखमी असलेल्या तीन तरुणांपैकी दोन तरुणांची प्रकृती ही चिंताजनक असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

( नक्की वाचा : 'भारत जोडो' अभियानात शहरी नक्षलवाद्यांचा शिरकाव, RR पाटलांचा संदर्भ देत CM फडणवीसांचा खुलासा )

दुसरीकडे पालघरमधूनही एक अपघाताची घटना समोर आली आहे. पालघरच्या सफाळे पूर्व भागातील पारगाव पुलावर ओव्हरटेक करण्याच्या नादात दोन दुचाकींची  समोरासमोर‌ टक्कर होऊन भीषण अपघात झाला. दारशेत येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक किशोर कृष्णा मांगले हे त्यांच्या दुचाकीवरून सफाळेच्या दिशेने जात असताना पारगावपुलावर समोरून येणाऱ्या ट्रकला ओव्हरटेकच्या नादात असलेल्या दुसऱ्या दुचाकीने  समोरासमोर  धडक दिली. या अपघातात शिक्षक किशोर मांगले हे गंभीर जखमी झाले असून त्यांचा एक हात आणि पाय फ्रॅक्चर झाला आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com