Nashik News : नाशिकमध्ये चिंता वाढली, राहत्या घरातून मुलगी बेपत्ता; आतापर्यंत तीन गुन्हे दाखल

काही महिन्यांपूर्वी मुंबई आणि नवी मुंबईतून अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.

जाहिरात
Read Time: 2 mins

राहुल वाघ, प्रतिनिधी

Nashik News : नाशिकमधील विविध भागात एका मुलासह दोन मुलींचं अपहरण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काही महिन्यांपूर्वी मुंबई आणि नवी मुंबईतून अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मोठ्या संख्येने मुलं आणि मुली बेपत्ता होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

शहर परिसरात वेगवेगळ्या ठिकाणांहून एका मुलासह दोन मुलींना फूस लावून अपहरण करण्यात आल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अपहरणाचा पहिला प्रकार मोरे मळा येथे घडला. फिर्यादी कामानिमित्त बाहेर गेले होते. सकाळी साडेअकरा वाजता त्यांचा मुलगा राहत्या घरातून शाळेसाठी बाहेर गेला होता. हा मुलगा बराच वेळ उलटूनही घरी परतला नाही. या मुलाला कोणी तरी अज्ञात इसमाने कशाचे तरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेत त्याचे अपहरण केले अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत. 

नक्की वाचा - Menstrual Pain :मासिक पाळीमुळे 19 वर्षांच्या मुलीचा मृत्यू; 19 वर्षांच्या कीर्तनाची हृदय पिळवटून टाकणारी कहाणी

कसं झालं अपहरण? 

अपहरणाचा दुसरा प्रकार गंगाघाट येथे घडला. तक्रारदार यांची लहान बहीण ही फिरस्ती आहे. १८ जानेवारी रोजी तक्रारदाराच्या आईचा दशक्रिया विधी गंगाघाटावर झाला. त्यानंतर तक्रारदाराची लहान बहीण ही बाहेर जाऊन येते, असे सांगून घरातून गेली. त्यानंतर ती घरी परतली नाही. या मुलीला कोणी तरी अज्ञात इसमाने कशाचे तरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेत तिचे अपहरण केले. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोनवणे करीत आहेत.

Advertisement

अपहरणाचा तिसरा प्रकार श्रमिकनगर येथे घडला. फिर्यादी यांची मुलगी घरी असताना अज्ञात इसमाने या मुलीला पळवून नेत तिचे अपहरण केले. बराच वेळ होऊनही मुलगी घरी परतली नाही. म्हणून तिच्या पालकांनी सातपूर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाच्या विरुद्ध अपहरणाची फिर्याद दिली असून याबाबतचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भडांगे करीत आहेत.

Topics mentioned in this article