![Accident news: 2 वर्षाचा चिमुकला 3 ऱ्या मजल्यावरून पडला, पुढं जे घडलं ते... Accident news: 2 वर्षाचा चिमुकला 3 ऱ्या मजल्यावरून पडला, पुढं जे घडलं ते...](https://c.ndtvimg.com/2025-01/h14dmqco_kalyan-_625x300_26_January_25.jpg?im=FitAndFill,algorithm=dnn,width=773,height=435)
अमजद खान
एक आश्चर्यकारक घटना डोंबिवली पश्चिमेला असलेल्या देवीपाडा इथं घडली आहे. इथं गावदेवी मंदीराजवळ अनुराज हाईट्स ही इमारत आहे. ही इमारत तेरा मजल्याची आहे. या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून दोन वर्षाचा चिमुकला खाली पडला. मात्र तो आश्चर्यकारक पद्धतीने सहीसलामत वाचला आहे. तो खाली कोसळला, त्यावेळचे अंगावर काटा आणणारे सीसीटीव्ही फुटेजही आता समोर आले आहे. देव तारी त्याला कोण मारी याचा प्रत्यय या निमित्ताने अनुराज हाईट्सच्या रहिवाशांना आला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा)
अनुराज हाईट्स ही तेरा मजली इमारत डोंबिवली पश्चिमेला आहे. शनिवारी दुपारी या इमारतीत एक खळबळजनक घटना घडली. बिल्डींगच्या तिसऱ्या मजल्यावरून एक दोन वर्षाचा चिमुकला खाली पडला. त्याच वेळी इमारतीच्या खाली भावेश म्हात्रे आणि त्याचे सहकारी गप्पा मारत उभे होते. त्याच वेळी तो चिमुकला खाली पडत आहे याकडे भावेशचे लक्ष गेले. त्यावेळी त्याने जराही वेळ न दवडता त्यामुलाकडे धाव घेतली.
त्यानंतर खाली पडणाऱ्या चिमुकल्याला त्याने झेलण्याचा प्रयत्न केला. पण झेल घेताना वेगात आलेला तो चिमुकला त्याच्या हातावरून खाली सटकला. तो चिमुकल्या भावेशच्या पायावर पडला. चिमुकल्याला यात थोडी दुखापत झाली आहे. पण त्याचे प्राण वाचले आहेत. त्या चिमुरड्याचे नशिब चांगले होते म्हणून थोडक्यावर भागलं. देव तारी त्याला कोण मारी याचाच प्रत्यय तिथे असलेल्या लोकांनी घेतला.
भावेशने ज्या पद्धतीने त्या चिमुकल्याचा जीव वाचवला त्याबद्दल त्याचं कौतूक होत आहे. बिल्डींगमध्ये मित्रांबरोबर आम्ही गप्पा मारत होतो असं भावेश सांगतो. त्यावेळी आपलं लक्ष त्या मुलाकडे गेलं. तो मुलगा खाली पडत होता. त्यावेळी मी धावत गेलो आणि त्याला झेलण्याचा प्रयत्न केला. त्यामुलाला हात लागला. त्याचा वेग कमी झाला. त्यानंतर तो हळूच माझ्या पायावर पडला असं ही भावेश सांगतो. त्याचे प्राण वाचले ही आपल्यासाठी मोठी गोष्ट आहे असंही तो म्हणाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world