जाहिरात
This Article is From Jan 26, 2025

Yogi Adityanath: 'कुंभ सनातन धर्माचं महापर्व, जगासाठी अकल्पनीय' योगी आदित्यनाथ थेट बोलले

त्रिवेणी से संदेश, एकता से अखंड रहेगा देश असं ही यावेळी योगी आदित्यनाथ म्हणाले.

Yogi Adityanath: 'कुंभ सनातन धर्माचं महापर्व, जगासाठी अकल्पनीय' योगी आदित्यनाथ थेट बोलले
प्रयागराज:

कुंभ हे सनातन धर्माचे महापर्व आहे. त्यामुळे सनातन धर्मात या कुंभचे वेगळेच महत्व आहे असे वक्तव्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले आहे. महाकुंभ संवादमध्ये NDTV ते एडिटर इन चीफ संजय पुगलिया यांना दिलेल्या खास मुलाखतीत ते बोलत होते. त्रिवेणी से संदेश, एकता से अखंड रहेगा देश असं ही यावेळी योगी आदित्यनाथ म्हणाले. कुंभच्या तयारी पासून ते विरोधकांच्या टीकेपर्यंत सर्वच विषयावर महाकुंभ संवादात योगी आदित्यनाथ स्पष्टपणे बोलले. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

आपण पहिल्यापासून बोलत आलो आहे. सनातन धर्म हा राष्ट्रीय धर्म आहे. मानवतेचा धर्म सनातन धर्म आहे. जाती, पंत, संप्रदाय वेगवेगळा असू शकतो. पण धर्म एकच आहे. तो सनातन धर्म आहे. कुंभ हा त्या सनातन धर्माचे महापर्व आहे. त्यामुळे कुंभचं महत्व वेगळं आहे. असं स्पष्ट मत या निमित्ताने योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केलं आहे. हा महाकुंभमेळा भारताच्या आस्थेची ताकद दाखवणारा आहे. हा कुंभ जगासाठी अकल्पनीय आहे. तर येणाऱ्या पिढीसाठी अविस्मर्णीय आहे. असं वक्तव्यही त्यांनी या निमित्ताने केले. 

ट्रेंडिंग बातमी - Pankaja Munde: मनोज जरांगेंना भेटणार का? पंकजा मुंडेंचे मोठे वक्तव्य, आता पुढे काय होणार?

महाकुंभच्या पहिल्या दोन दिवसात 6 कोटी भाविकांनी त्रिवेणी संगमात स्नान केल्याची माहिती या निमित्ताने योगी आदित्यनाथ यांनी दिली. त्यातून भाविकांनी एक संदेश दिला तो म्हणजे हा देश अखंड आहे. जातीभेद, प्रांतभेद, भाषाभेद, शीवाशिव इथं नव्हती. देशातील लोक इथं आलेच. पण जगातले भाविक ही महाकुंभात सहभागी झाले. हे सर्व अद्भूत आणि अकल्पनीय आहे. रोज एक कोटी लोक या महाकुभात येत आहे. त्रिवेणी संगमात स्नानकरत आहेत असंही ते यावेळी म्हणाले. आतापर्यंत जवळपास 12 कोटी पेक्षा जास्त भाविक प्रयागराजमध्ये आले आहेत. त्यांनी आस्थेची डुबकी त्रिवेणी संगमात मारली आहे असंही सांगितलं.  

ट्रेंडिंग बातमी - IND vs ENG: सचिन तेंडुलकरला 'या' बॅट्समनची बॅटींग पहायला आवडते, म्हणाला त्याची बॅटींग पहाणे म्हणेज...

प्रयागराजमध् सध्याच्या स्थितीत रोज एक कोटी भाविक येत आहेत. त्यांच्यासाठी चांगल्या सोई उपलब्ध करून दिल्या आहेत. प्रयागराजमध्ये स्वच्छता ठेवण्यात आली. वाहतूकीची चोख व्यवस्था केली गेली आहे. अनेक फ्लायओव्हर उभारले गेले आहेत. ट्राफीकची समस्या निर्माण होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. जवळपास पाच हजार एकरवर पार्कींगची व्यवस्था केली गेली. त्यामुळे भाविकांची कुठलीही गैरसोय झाली नाही. त्याचं सर्वत्र कौतूक देशातच नाही तर जगभरात होत आहे. ही उत्तर प्रदेशसाठी अभिनामाची गोष्ट आहे. कुंभ आधी सरकारने होमवर्क केला होता. कोणत्या गोष्टी टाळल्या पाहीजेत. कोणत्या गोष्टीवरून टीका होते. याचा अभ्यास केला. ट्राफीक, चेंगराचेंगरी, अस्वच्छता,पार्कींग या गोष्टींवर बारीक लक्ष दिलं गेलं. त्यानंतर संपूर्ण कुंभाचे नियोजन केल्याचे ते म्हणाले. त्याचा रिझल्ट आता मिळत आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Guillain Barre Syndrome: पुणेकरांना मोठा दिलासा! GBSच्या पेशंटवर 'या' रुग्णालयात होणार मोफत उपचार

त्यांनी यावेळी उत्तर प्रदेश पोलीसांचेही कौतूक केले. आम्ही रामाचे भक्त आहोत. त्यामुळे प्रभू रामानेच सांगितलं आहे. सज्जनांचे संरक्षण आणि दुर्जनांचा संहार. आमच्या सरकारची ही तिच भूमीका आहे. त्यानुसार पोलीसही काम करत असल्याचे योगी आदित्यनाथ यावेळी म्हणाले. दरम्यान महाकुंभचे एनडीटीव्हीने केलेल्या रिपोर्टींगचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कौतूक केले. या रिपोर्टींगमुळे कुंभचे खरे चित्र देशासमोर गेल्याचं ही ते म्हणाले. 
 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com