जाहिरात

Ulhasnagar: उल्हासनगरच्या राजकारणात मोठा भूकंप! खंडणी प्रकरणात ओमी कलानीच्या खास माणसाला अटक

Ulhasnagar News: या खंडणी प्रकरणात उल्हासनगरमधील काही 'मोठे मासे' (उच्चभ्रू व्यक्ती) अडकण्याची शक्यता आहे.

Ulhasnagar:  उल्हासनगरच्या राजकारणात मोठा भूकंप! खंडणी प्रकरणात ओमी कलानीच्या खास माणसाला अटक
Ulhasnagar News: अटक करण्यात आलेला आरोपी चार वर्षांपासून फरार होता.
उल्हासनगर:

Ulhasnagar News: भाजपच्या एका पदाधिकाऱ्याला धमकी देऊन खंडणी मागितल्याप्रकरणी ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने (Thane Crime Branch) 'टीम ओमी कलानी'चा सदस्य आणि ओमी कलानीचा (Omi Kalani) निकटवर्तीय असलेल्या पंकज त्रिलोकानीला अटक केली आहे. 2021 मध्ये झालेल्या या घटनेनंतर तो फरार होता. त्रिलोकानीच्या अटकेमुळे या खंडणी प्रकरणात उल्हासनगरमधील काही 'मोठे मासे' (उच्चभ्रू व्यक्ती) अडकण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने येथील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण?

उल्हासनगर येथे राहणारे भाजप पदाधिकारी अमित वाधवा यांना 2021 मध्ये एक फोन आला होता. फोन करणाऱ्या व्यक्तीने स्वतःचे नाव सुरेश पुजारी असे सांगत वाधवा यांच्याकडे 1 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. या धमक्यांनंतर अमित वाधवा यांनी उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी जीवे ठार मारण्याची धमकी देऊन खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल केला आणि तपास सुरू केला.

Latest and Breaking News on NDTV

कर्ज परत न करण्यासाठी खंडणीचा कट?

अमित वाधवा यांच्या तक्रारीनुसार, खंडणी मागण्यामागे एक विशिष्ट कारण होते. वाधवा यांच्या 'कल्पतरु क्रेडीट सोसायटी' मधून चार व्यक्तींनी 2 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. हे कर्जाचे पैसे परत करावे लागू नयेत यासाठी, गँगस्टर सुरेश पुजारी याच्याकडून अमित वाधवा यांना धमकावण्यात आले होते.

या खंडणी प्रकरणात अनेक आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. पंकज त्रिलोकानीनेही अर्ज केला होता, परंतु त्याला अटकपूर्व जामीन मिळाला नाही. त्यानंतर तो फरार झाला होता. अखेर, ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने पंकज त्रिलोकानी याला उल्हासनगरमधून अटक केली.

मोठे मासे अडकणार?

पंकज त्रिलोकानी हा ओमी कलानी यांचा निकटवर्तीय आणि 'टीम ओमी कलानी'चा सदस्य असल्याने, त्याच्या अटकेमुळे या खंडणी प्रकरणात उल्हासनगरमधील काही मोठ्या राजकीय आणि प्रतिष्ठित व्यक्तींची नावे समोर येण्याची आणि त्यांनाही अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्रिलोकानीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या अटकेमुळे उल्हासनगरच्या राजकारणात सध्या तणावाचे वातावरण आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com