Ulhasnagar Voter List: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. दुसरीकडे मतदार याद्यंमधील घोळ काही संपत नसल्याचे चित्र दिसत आहे. एकीकडे दुबार मतदारांची यादी वाढत असतानाच मतदारांची विचित्र नावेही समोर येत आहेत. उल्हासनगरमध्ये असाच प्रकार समोर आला असून चक्क महाराष्ट्र नावाचे मतदार आढळल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत.
मतदाराचे नाव महाराष्ट्र
समोर आलेल्या माहितीनुसार, उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रारूप मतदार यादीत ५७ वर्षीय महिलेचे नाव फक्त 'महाराष्ट्र' असे लिहिले आहे, तर तिच्या पतीचे नावही 'महाराष्ट्र' असे लिहिले आहे, परंतु आडनाव लिहलेले नाही. या अजब नावावरुन शिवसेना ठाकरे गट आणि मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे.
Navi Mumbai Crime: घराबाहेर पडल्या त्या परतल्याच नाहीत.. 4 मुलींसोबत काय घडलं? मुंबईत खळबळ
गुरुवारी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष धनंजय बोडारे यांनी हे नाव अधोरेखित केले होते आणि ते मतदार यादी क्रमांक ३२४ च्या वॉर्ड क्रमांक १९ मधील अनुक्रमांक २१ वर आहेत, असे त्यांनी सांगितले. त्यांनी मतदारांच्या माहितीत फेरफार केल्याचा आणि मतदार यादीत बनावट आणि डुप्लिकेट नोंदी असल्याचा आरोप केला. तसेच मनसेचे जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख यांनीही बरीच नावे जाणूनबुजून समाविष्ट करण्यात आली आल्याचा आरोप केला आहे.
मविआ आक्रमक..
दरम्यान, महाविकास आघाडी (एमव्हीए) मधील राजकारण्यांनी महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांची भेट घेतली आणि प्रारूप यादीत अनेक सदस्यांकडे लक्ष वेधून औपचारिक तक्रार सादर केली. बोडारे म्हणाले की, अनेक मतदारांची नावे चुकीच्या पद्धतीने इतर वॉर्डमध्ये हलवण्यात आली आहेत. उल्हासनाच्या वॉर्ड १९ आणि २० मध्ये अंबरनाथ-पाव येथील ५०० हून अधिक रहिवाशांची नावे समाविष्ट असल्याचे आढळून आले आहे.
Akola News : राज्यात निवडणूक प्रचाराला वेग; अकोटमध्ये मात्र उमेदवार भलत्याच मोहिमेत व्यग्र
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world