जाहिरात

Pune Rave Party: प्रांजल खेवलकर प्रकरणात केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंची मोठी प्रतिक्रिया, नाव न घेता दिला सल्ला

Pune Rave Party: एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर सध्या तुरुंगात आहे. या प्रकरणावर केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Pune Rave Party: प्रांजल खेवलकर प्रकरणात केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंची मोठी प्रतिक्रिया, नाव न घेता दिला सल्ला
Pune Rave Party: पुणे रेव्ह पार्टी प्रकरणात प्रांजल खेवलकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
जळगाव:

मंगेश जोशी, प्रतिनिधी 

Pune Rave Party:  पुणे पोलिसांनी 27 जुलै रोजी एका हॉटेलवर टाकलेल्या धाडीत एका रेव्ह पार्टीचा पर्दाफाश केला. पोलिसांनी यामध्ये अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकरचाही समावेश आहे. या प्रकरणात रोज नवे खुलासे होत आहेत. त्याचबरोबर राजकारणाचाही आरोप होत आहे. एकनाथ खडसे तसंच त्यांच्या कन्या आणि खेवलकरांच्या पत्नी रोहिणी खडसे यांनी या प्रकरणात राजकारणाचा आरोप केलाय. 

या सर्व प्रकरणात भाजपा खासदार तसंच केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. रक्षा खडसे या एकनाथ खडसे यांच्या सून आहेत. 'जे काही सुरु आहे त्याच्या आपल्याला वेदना होत आहेत, ' असं रक्षा खडसे यांनी या प्रकरणाबाबत म्हंटलंय. 

( नक्की वाचा : Pune Rave Party : 'माल पाहिजे का'? पोलिसांच्या तपासात खडसेंच्या जावयाबाबत अनेक धक्कादायक गोष्टी उघड )
 

केंद्रात जबाबदार मंत्री असल्यानं या प्रकरणातील तथ्य समोर येत नाही तोपर्यंत यावर भाष्य करावं असं वाटत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.  त्याचबरोबर जिल्ह्यातील राजकारण कशा पद्धतीने जात आहे हे सर्वजण बघत असून हे कुठेतरी थांबलं पाहिजे असं म्हणत प्रांजल खेवलकर प्रकरणात राजकारण होत असल्याचा अप्रत्यक्ष आरोप रक्षा खडसे यांनी केला आहे. तसेच जिल्ह्यातील कोणीही नेता असो त्यांनी विकासावर भर दिला पाहिजे असे म्हणत खडसे व महाजन यांचे नाव न घेता रक्षा खडसे यांनी सल्ला दिला आहे.

234 अश्लील फोटो, 19 अश्लील व्हिडीओ....

दरम्यान, खेवलकर यांच्या  मोबाईलमध्ये तब्बल 1749 व्हिडीओ आणि फोटो सापडले आहेत. त्यात 234 अश्लील फोटो आहेत. तर 19 अत्यंत अश्लील व्हिडीओ आहेत. खेवलकरच्या मोबाईलमध्ये मोलकरणींचे अत्यंत वाईट अवस्थेतले व्हिडीओ ही आढळून आले आहेत, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केला आहे. 

खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरांनी पुण्यात केलेली रेव्ह पार्टी ही फक्त पार्टीपुरती मर्यादित नाही. तर या पार्टीचे धागेदोरे मानवी तस्करीपर्यंत पोहोचत आहेत, असा खळबळजनक गौप्यस्फोट चाकणकर यांनी केलाय. 

प्रांजल खेवलकरांच्या मोबाईलमध्ये काय काय आक्षेपार्ह सापडलं, याची यादीच चाकणकरांनी सादर केली आहे. खेवलकरांच्या मोबाईलमध्ये 252 व्हिडीओ आणि 1497 फोटो सापडले आहेत.  एकूण 1749 व्हिडीओ आणि फोटो या मोबाईलमध्ये होते. त्यापैकी 234 फोटो आणि 19 व्हिडीओ अत्यंत अश्लील होते. मुलींना विवस्त्र करुन, नशा देऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले जात होते.

 लैंगिक अत्याचाराचे व्हिडीओ शूट करुन त्याचा ब्लॅकमेलिंगसाठी वापर केला जात होता. सिनेमात काम देण्याचं मुलींना आमिष दाखवलं जातं होतं. लोणावळा, गोवा, साकीनाका, जळगावात मुलींना बोलावलं जात होतं.  मुलींना पार्टीत बोलावून गांजा आणि अमली पदार्थ दिले गेले. मोलकरणीचेही अत्यंत वाईट अवस्थेतील फोटो समोर आले आहेत. मोबाईलमध्ये 7 मुलींचं नाव आरूष नावाने सेव्ह करण्यात आलं होतं. आरुष नावाचा मुलींचा दलाल असल्याचं उघड झालं आहे, असंही चाकणकर यांनी सांगितलं. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com