जाहिरात

Vasai Crime: वसईच्या भोंदूबाबाची आरोपीच्या नवऱ्यासोबत झाली होती खास बैठक, वाचा नवं धक्कादायक वळण

Vasai Crime:  स्वतःला महादेवाचा अवतार म्हणवून घेणाऱ्या ऋषिकेश वैद्य याच्या भोंदूगिरीचा पर्दाफाश झाला असून, दोन वर्षांपासून सुरू असलेल्या एका महिलेच्या छळाचे धक्कादायक प्रकरण आता समोर आले आहे.

Vasai Crime: वसईच्या भोंदूबाबाची आरोपीच्या नवऱ्यासोबत झाली होती खास बैठक, वाचा नवं धक्कादायक वळण
Vasai Crime: वसईच्या भोंदूबाबा प्रकरणात एक नवी माहिती समोर आली आहे.
वसई:

Vasai Crime:  स्वतःला महादेवाचा अवतार म्हणवून घेणाऱ्या ऋषिकेश वैद्य याच्या भोंदूगिरीचा पर्दाफाश झाला असून, दोन वर्षांपासून सुरू असलेल्या एका महिलेच्या छळाचे धक्कादायक प्रकरण आता समोर आले आहे. वसईतील हयात बंगल्यात झालेल्या एका बैठकीत वादावादी आणि थेट हल्ल्याचा प्रकार घडल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे. 

दोन वर्षांपासूनचा मानसिक छळ आणि पाठलाग

आरोपी ऋषिकेश वैद्य हा मागील 2 वर्षांपासून पीडित महिलेला फोन कॉल आणि मेसेजच्या माध्यमातून सतत त्रास देत होता. सुरुवातीला हा प्रकार गुपित होता, मात्र आरोपीचा हस्तक्षेप वाढल्याने पीडितेच्या कौटुंबिक आयुष्यात तणाव निर्माण झाला. 

हा सर्व प्रकार जेव्हा पीडितेच्या पतीला समजला, तेव्हा त्यांनी या प्रकरणाचा जाब विचारण्याचे ठरवले. यातूनच वादाची ठिणगी पडली आणि हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले.

( नक्की वाचा : Ashok Kharat: धक्कादायक! मंत्रिमंडळ निवडीतही खरातची लुडबुड? अजित पवारांच्या दरबारात थेट पोहोचला होता निरोप )

हयात बंगल्यातील बैठक आणि प्रत्यक्ष हल्ला

या वादावर तोडगा काढण्यासाठी 29 ऑक्टोबर 2025 रोजी वसईतील हयात बंगल्यात एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पीडिता, तिचा पती, आरोपी ऋषिकेश वैद्य आणि आरोपीने स्थापन केलेल्या एका संस्थेचे काही सदस्य उपस्थित होते. चर्चेच्या दरम्यान वातावरण तापले आणि संतापलेल्या पतीने ऋषिकेश वैद्यवर हल्ला केला. या गोंधळात मध्यस्थी करणाऱ्या एका सदस्यालाही मारहाण झाली. या घटनेनंतर 30 ऑक्टोबर 2025 रोजी पीडितेच्या पतीविरोधात पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदवला आहे.

गंभीर आरोपांनंतर पोलिसात गुन्हा दाखल

बैठकीत झालेल्या राड्यानंतरही आरोपीचा त्रास थांबला नाही, उलट पीडित महिलेचा छळ सुरूच राहिला. सततची फसवणूक, मानसिक छळ आणि लैंगिक अत्याचाराच्या गंभीर आरोपांनंतर पीडितेने अखेर माणिकपूर पोलीस ठाण्यात धाव घेतली. आपल्या तक्रारीत तिने भोंदू बाबाने कशा प्रकारे तिचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, याचे सविस्तर वर्णन केले आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी ऋषिकेश वैद्यविरोधात गुन्हा दाखल करून तपासाला गती दिली आहे.

(  नक्की वाचा : Ashok Kharat : 'कुणावरही जबरदस्ती केली नाही, जे केलं ते...'; भोंदू खरातने पोलिसांना काय सांगितलं? वाचा सविस्तर )

या प्रकरणात आणखी कोणाची फसवणूक झाली आहे का, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. येत्या काळात या प्रकरणातून आणखी काही खळबळजनक बाबी समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com