VIDEO : हातात बंदूक, सोबत बाऊन्सर...जमिनीसाठी शेतकऱ्यांना धमकी; पूजा खेडकरांच्या आईचा प्रताप

पूजा खेडकर यांच्यानंतर त्यांच्या आई मनोरमा खेडकर यांचा प्रताप समोर आला आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
पुणे:

वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर (Controversial IAS officer Pooja Khedkar) यांचे कारनामे देशभरात चर्चेचा विषय ठरला आहे. दरम्यान पूजा खेडकर यांच्यानंतर त्यांच्या आई मनोरमा खेडकर यांचा प्रताप समोर आला आहे. पूजा खेडकर यांनी प्रशिक्षणार्थी म्हणून रुजू झाल्यानंतर पूजा जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र केबिन, वाहन, निवासी व्यवस्था याची मागणी केली होती. त्याशिवाय वडिलांची 40 कोटींची संपत्ती असताना त्यांनी नॉनक्रिमिलेयरअंतर्गत नोंदणी कशी केली? असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

पूजा खेडकर यांनी त्यांच्या खासगी ऑडी वाहनावर लाल दिवा लावला होता. याचा फोटो समोर आल्यानंतर पूजा खेडकर प्रकरणात अनेक धक्कादायक प्रकरणं समोर आली.  दरम्यान वाहनावर लाल दिवा लावल्याप्रकरणी पोलिसांनी 11 जुलै रोजी त्यांच्यावर कारवाई केली. पूजा खेडकर यांच्याबाबत एकामागून एक गोष्टी समोर येत असताना आता त्यांची आई मनोरमा खेडकर यांचा एक प्रताप समोर आला आहे. 

Advertisement

नक्की वाचा - वडिलांची संपत्ती 40 कोटी, लेकीला नॉन क्रिमिलेयरमधून IAS पद; पूजा खेडकरांना कोणाचा राजकीय वरदहस्त?

पूजा खेडकरांच्या मातोश्रीचा धक्कादायक प्रकार...


पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांनी अनेक ठिकाणी जमीन खरेदी केल्याचं समोर आलं आहे. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात खेडकर कुटुंबाने 25 एकर जमीन खरेदी केली आहे. यातील एका प्रकरणात जमीन खरेदी करताना शेजारीस शेतकऱ्याच्या जमिनीवर देखील त्यांनी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केल्याची आरोप केला जात आहे. दरम्यान पूजा खेडकरच्या आईचा एक जुना व्हिडिओ समोर आला आहे. शेतकऱ्यांकडून जेव्हा याला विरोध करण्यात आला तेव्हा पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर या बाऊन्सर घेऊन तिथं पोहचल्या. त्यांनी हातात पिस्तूल घेऊन या शेतकऱ्यांना धमकावल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या शेतकऱ्यांनी पुण्यातील पौड पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला असता यावरून दबाव आल्याने त्याची तक्रारही नोंदवली गेली नाही, असाही दावा केला जात आहे. 

Advertisement
Advertisement

त्यामुळे खेडकर कुटुंबाला कुणाचा राजकीय वरदहस्त आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.