जाहिरात

Nostradamus: 2026 मध्ये मृत्यू बनून येणार मधमाश्या? नास्त्रेदमसच्या त्या एका भविष्यवाणीने वाढवली जगाची धडधड

Nostradamus Predictions 2026 : येत्या काही दिवसांतच नवीन वर्षाचे आगमन होणार आहे. अशा वेळी 2026 हे वर्ष जगासाठी कसे असेल, याबाबत सर्वांच्या मनात उत्सुकता आहे.

Nostradamus: 2026 मध्ये मृत्यू बनून येणार मधमाश्या? नास्त्रेदमसच्या त्या एका भविष्यवाणीने वाढवली जगाची धडधड
Nostradamus Predictions 2026 : प्रसिद्ध फ्रेंच भविष्यवेत्ता नास्त्रेदमस याने शेकडो वर्षांपूर्वी वर्तवलेली काही भाकिते चर्चेत आहेत.
मुंबई:

Nostradamus Predictions 2026 :  येत्या काही दिवसांतच नवीन वर्षाचे आगमन होणार आहे. अशा वेळी 2026 हे वर्ष जगासाठी कसे असेल, याबाबत सर्वांच्या मनात उत्सुकता आणि भीती असे दोन्ही भाव पाहायला मिळत आहेत. प्रसिद्ध फ्रेंच भविष्यवेत्ता नास्त्रेदमस याने शेकडो वर्षांपूर्वी वर्तवलेली काही भाकिते सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आली आहेत. 

नास्त्रेदमसने आपल्या भविष्यवाणीत 26 या आकड्याचा एक असा फेरा सांगितला आहे, जो वाचून अनेकांच्या अंगावर काटा येत आहे. यामध्ये मधमाश्यांचा हल्ला आणि रक्ताच्या नद्या वाहण्यासारखे भयानक उल्लेख असल्याने जग एका मोठ्या विनाशाकडे तर जात नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

नास्त्रेदमस आणि  भविष्यातील कोड्यांचा प्रवास

मिशेल द नास्त्रेदमस यांचा जन्म 1503 मध्ये झाला होता. त्यांनी त्यांच्या हयातीत लेस प्रोफेटीस (Les Prophéties) नावाचे एक पुस्तक लिहिले होते. या पुस्तकात त्याने 4 ओळींच्या अनेक कविता लिहिल्या आहेत, ज्यांना 'क्वाट्रॅन्स' असे म्हटले जाते. नास्त्रेदमसच्या चाहत्यांचा असा दावा आहे की, त्याने आपल्या जन्मानंतर शेकडो वर्षांनी घडणाऱ्या घटनांची अचूक माहिती या पुस्तकात देऊन ठेवली आहे. 

मात्र, त्याची लिहिण्याची पद्धत अत्यंत गुंतागुंतीची आणि कोड्यांसारखी असल्याने एकाच वाक्याचे अनेक वेगवेगळे अर्थ काढले जाऊ शकतात. 2026 या वर्षासाठी देखील अशाच एका कोड्याचा आधार घेतला जात आहे.

(नक्की वाचा : Trending News : सावधान! महिलांनी कॅमेरा फोन वापरला तर होणार कारवाई; 15 गावांनी लागू केला जाचक नियम )

मधमाश्यांचा हल्ला म्हणजे काय?

नास्त्रेदमसने आपल्या लेखनात 2026 या सालाचा थेट उल्लेख केलेला नाही, परंतु त्याच्या 26 व्या क्रमांकाच्या कवितेचा संबंध 2026 या वर्षाशी जोडला जात आहे. 

या कवितेत त्याने 'मधमाश्यांचा मोठा थवा येईल आणि रात्रीच्या वेळी अचानक हल्ला होईल' असे लिहून ठेवले आहे. अनेक विश्लेषकांच्या मते, येथे मधमाश्यांचा अर्थ नैसर्गिक कीटक नसून आधुनिक युद्धातील 'ड्रोन' असा असू शकतो. 

आजच्या काळात ज्याप्रमाणे एकाच वेळी शेकडो ड्रोनचा वापर करून शत्रूवर हल्ला केला जातो, त्याला 'ड्रोन स्वॉर्म' असेही म्हणतात. त्यामुळे 2026 मध्ये एखादे मोठे तांत्रिक युद्ध पाहायला मिळू शकते, अशी भीती व्यक्त होत आहे.

( नक्की वाचा : Dhurandhar: रहमत डकैतचा अंत सिनेमात दाखवला तसाच झाला होता का? वाचा 'Reel vs Real' स्टोरी )
 

रक्ताच्या नद्या वाहणार

नास्त्रेदमसच्या एका भविष्यवाणीत रक्ताच्या नद्या वाहण्याबाबत आणि स्वित्झर्लंडमधील टिसिनो शहराचा उल्लेख करण्यात आला आहे. शांतताप्रिय समजल्या जाणाऱ्या या भागात अशा प्रकारची हिंसा होण्याचे संकेत चिंताजनक मानले जात आहेत. तसेच, त्याने असेही म्हटले आहे की 'पश्चिमेचा प्रकाश शांत होईल आणि पूर्वेकडून तीन आगी उठतील'. 

या भविष्याचा अर्थ अनेक तज्ज्ञ असा लावत आहेत की, अमेरिका आणि युरोप सारख्या पाश्चात्य देशांची शक्ती कमी होऊन आशियाई देशांचा दबदबा वाढू शकतो. काही लोक याला आर्थिक मंदी आणि एआयमुळे येणाऱ्या बेरोजगारीशी देखील जोडत आहेत.

मोठ्या नेत्याचा अंत आणि जागतिक उलथापालथ

नास्त्रेदमसने एका ठिकाणी असे नमूद केले आहे की, एका मोठ्या व्यक्तीचा अचानक वीज पडून मृत्यू होईल. याचा राजकीय अर्थ काढला जात असून, जगातील एखाद्या खूप मोठ्या आणि प्रभावशाली नेत्याचा 2026 मध्ये अचानक अंत होऊ शकतो, ज्यामुळे जागतिक राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. 

नेपोलियनच्या काळात मधमाश्या हे सत्तेचे प्रतीक मानले जात होते, त्यामुळे व्लादिमीर पुतिन किंवा डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखा एखादा नेता जगाचा नकाशा बदलणारा निर्णय घेऊ शकतो, अशीही चर्चा सध्या रंगली आहे.

मानवतेसाठी आशेचा किरण असलेला प्रकाश पुरुष

इतक्या सर्व भयानक भविष्यवाण्यांच्या दरम्यान नास्त्रेदमसने एक आशेचा किरण देखील दाखवला आहे. त्याने एका 'मॅन ऑफ लाईट' म्हणजेच प्रकाश पुरुषाचा उल्लेख केला आहे. जग जेव्हा मोठ्या संकटात आणि विनाशाच्या उंबरठ्यावर असेल, तेव्हा हा महापुरुष जगाला वाचवण्यासाठी येईल, असे मानले जाते.

हा व्यक्ती जगाला नवी आध्यात्मिक दिशा देईल आणि शांतता प्रस्थापित करेल, अशी आशा अनेकांना वाटत आहे. नास्त्रेदमसची ही भाकिते किती खरी ठरणार हे काळच ठरवेल, मात्र सध्या या विषयाने जगभरात भीती आणि कुतूहल निर्माण केले आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com