जाहिरात

Video: भारताचा पराभव होताच पाकिस्तानी फॅन्सची मुजोरी; 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला घेरलं, पाहा त्याचं उत्तर

Vaibhav Suryavanshi Video : U19 आशिया कप 2025 च्या फायनलमध्ये पाकिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारतीय खेळाडूंना मैदानाबाहेरही विचित्र अनुभवाचा सामना करावा लागला.

Video: भारताचा पराभव होताच पाकिस्तानी फॅन्सची मुजोरी; 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला घेरलं, पाहा त्याचं उत्तर
मुंबई:

Vaibhav Suryavanshi Video : U19 आशिया कप 2025 च्या फायनलमध्ये पाकिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारतीय खेळाडूंना मैदानाबाहेरही विचित्र अनुभवाचा सामना करावा लागला. पाकिस्तानच्या चाहत्यांनी टीम इंडियाच्या खेळाडूंना घेरून त्यांच्यावर हुल्लडबाजी केली आणि प्रचंड घोषणाबाजी केली. 

या सर्व प्रकारात 14 वर्षांचा युवा स्टार बॅटर वैभव सूर्यवंशी याला लक्ष्य करण्यात आले, पण त्याने ज्या पद्धतीने या परिस्थितीचा सामना केला, त्याचे सध्या सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

पाकिस्तानच्या फॅन्सनी काय केलं?

रविवारी झालेल्या हायव्होल्टेज सामन्यात पाकिस्तानने भारताचा 191 रनने पराभव करत जेतेपद पटकावले. सामना संपल्यानंतर भारतीय खेळाडू जेव्हा आपल्या टीम बसकडे परतत होते, तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या काही पाकिस्तानी समर्थकांनी त्यांना डिवचण्यास सुरुवात केली. 

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये दिसते की, चाहते भारतीय खेळाडूंना पाहून ओरडत होते आणि त्यांच्यावर कमेंट्स करत होते. विशेषतः लहान वयात मोठी कामगिरी करणाऱ्या वैभव सूर्यवंशीला पाहून या चाहत्यांनी जोरजोरात ओरडण्यास सुरुवात केली.

( नक्की वाचा : T20 World Cup 2026 : टीम इंडियातून Shubman Gill आऊट! बीसीसीआयचा मोठा निर्णय; नेमकं कुठं बिनसलं? Inside Story )

वैभव सूर्यवंशीचं उत्तर

अशा तणावाच्या परिस्थितीत अनेकदा खेळाडूंचा संयम सुटतो, पण वैभव सूर्यवंशीने मात्र कमालीची प्रगल्भता दाखवली. चाहत्यांनी आरडाओरडा करूनही वैभवने त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. 

त्याने कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया न देता शांतपणे चालणे पसंत केले. वैभवच्या या वागण्याने हे सिद्ध केले की तो केवळ बॅटनेच नाही तर स्वभावानेही मैदानावर किती खंबीर आहे. त्याच्या या 'कूल' अंदाजामुळे हुल्लडबाजी करणाऱ्या चाहत्यांना चोख प्रत्युत्तर मिळाले आहे.

 पाकिस्तान बोर्डाचा भारतावरच आरोप

एकीकडे चाहत्यांच्या वागण्यावर टीका होत असताना, दुसरीकडे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष मोहसिन नकवी यांनी भारतीय खेळाडूंवरच गंभीर आरोप केले आहेत.

फायनल दरम्यान भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंना डिवचल्याचा दावा त्यांनी केला आहे. नकवी यांनी म्हटले आहे की, खेळादरम्यान भारतीय खेळाडूंचे वर्तन चिथावणीखोर होते आणि याबाबत ते आयसीसीकडे औपचारिक तक्रार करणार आहेत. राजकारण आणि खेळ वेगळे ठेवले पाहिजेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

मैदानावरील तणाव आणि हस्तांदोलन टाळले

या सामन्यात दोन्ही संघांमधील खेळाडूंमध्ये शाब्दिक चकमक झाल्याचे पाहायला मिळाले. इतकेच नाही तर सामन्याच्या सुरुवातीला आणि सामन्यानंतर खेळाडूंनी परंपरेनुसार एकमेकांशी हस्तांदोलन करणे देखील टाळले. 

पाकिस्तानचा मेंटॉर सरफराज अहमद यानेही भारतीय खेळाडूंच्या वागणुकीवर नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, पाकिस्तानने तक्रार केली तरी आयसीसी मॅच रेफ्रींच्या रिपोर्टच्या आधारावरच पुढील निर्णय घेईल. एप्रिलमध्ये झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध अधिक ताणले गेले आहेत, ज्याचा परिणाम आता मैदानावरही दिसून येत आहे.

इथे पाहा Video

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com