Virar Building Collapse : माय-लेकीचा मृत्यू, वडील बेपत्ता, मुलीच्या वाढदिवशीच कुटुंबावर काळाचा घाला

'Happy Birthday to youu..' अन्...., लेकीचा पहिला वाढदिवस ठरला शेवटचा

जाहिरात
Read Time: 1 min

मनोज सातवी, प्रतिनिधी

Virar Building Collapse : महाराष्ट्रातील घरोघरी गणेशोत्सवाचा उत्साह सुरू आहे. बाप्पाचं आगमन झालं आहे. मुंबईला तर एखाद्या जत्रेचं रुप आलं आहे. यादरम्यान मुंबईपासून काही अंतरावरील विरारमधून (Virar News) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. विरार पूर्वेच्या नारंगी येथील रमाबाई अपार्टमेंट या इमारतीची एक बाजू कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. 

दुर्घटना घडली त्या दिवशी (26 ऑगस्ट) या इमारतीत राहणाऱ्या उत्कर्षाचा पहिला वाढदिवस होता. त्यानिमित्ताने तिच्या आई-वडिलांनी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. मात्र हा वाढदिवस पहिला आणि शेवटचा ठरला. विरारमधील रमाबाई अपार्टमेंटमध्ये उत्कर्षा ओमकार जोईल हिचा पहिलाच वाढदिवस होता. त्यामुळे वडील ओमकार जोईल (25) आणि आई आरोही ओमकार जोईल (23) यांनी त्यांच्या चौथ्या माळ्यावरील घरीच वाढदिवसाचा छोटेखानी कार्यक्रम आयोजित केला होता, मात्र या आनंदाच्या क्षणावरच काळाने घाला घातला.

नक्की वाचा - Nalasopara News: इन्स्टाग्रामवर तरुणीला मेसेज पाठवणे महागात पडले, आधी बेदम मारहाण नंतर..

वाढदिवस सुरू असताना अचानक रमाबाई अपार्टमेंटचा तोच भाग कोसळला आणि होत्याचं नव्हतं झालं. या दुर्घटनेत चिमुकल्या उत्कर्षाच्या आईचा जागीच मृत्यू झाला. उत्कर्षाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून उत्कर्षाचे वडील ओमकार जोईल हे अद्याप सापडलेले नाहीत. इमारतीच्या ढिगाऱ्यातून अद्यापही काहीजण अडकले आहे. 

Topics mentioned in this article