होळीसाठी लाकडं शोधायला गेले अन् हातात महिलेचं कापलेलं शीर; मुंबईजवळील धडकी भरवणारी घटना

मुंबईच्या जवळील भागातून हा धडकी भरवणारा प्रकार समोर आला आहे. महिलेचे इतर अवयव कुठे आहेत, याचा शोध घेतला जात आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

मनोज सातवी, प्रतिनिधी 

राज्यभरात होळी-धुळवडचा उत्साह पाहायला मिळत आहे. आज धुळवडसाठी राज्यभरात रंगाची उधळण केली जात आहे. सर्वजण एकमेकांना रंग लावून आनंद साजरा करीत आहेत. होळीचा आनंद सुरू असताना विरारमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.   

मांडवी पोलीस स्टेशनअंतर्गत विरार रस्त्यावर पिरकुंडा दर्ग्याजवळ सुटकेसमध्ये महिलेचे कापलेली शीर आढळून आल्याने विरार परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विरार रस्त्यावर पिरकुंडा दर्ग्याच्या मागे होळी निमित्ताने स्थानिक ग्रामस्थ लाकडे आणण्यासाठी रानात गेले होते. यावेळी त्यांना एक सुटकेस आढळून आली. या सुटकेसमध्ये एका महिलेचे कापलेले शीर दिसून आले. यानंतर त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. 

नक्की वाचा - Crime news: वर्षभरात 42 हत्या, 52 हाफ मर्डर,'या' जिल्ह्यात गुन्हेगारीचा कळस

पोलिसांनी महिलेचं कापलेलं शीर असलेली सुटकेस ताब्यात घेतली आहे. प्राथमिक तपासानुसार महिलेची हत्या करून तिच्या शरीराचे अवयव वेगवेगळे करून ते सुटकेसमध्ये घालून आरोपीने त्याची विल्हेवाट लावल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तसेच, सदर महिला पश्चिम बंगालची रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र अजूनही तिची पूर्ण ओळख समोर आलेली नाही. या महिलेची हत्या कोणी आणि का केली? तसेच इतर अवयव आरोपींनी कुठं लपवले, याचा शोध घेण्याचं पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे.

Topics mentioned in this article