योगेश शिरसाट, प्रतिनिधी
Akola Crime News Today : अकोला शहरातील जुने शहर परिसरात खळबळ उडवणारी घटना घडली आहे. डाबकी रोड पोलीस स्टेशन हद्दीतील जकात नाका परिसरातील कॅनॉल नाल्यात एका महिलेचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आज दुपारच्या सुमारास स्थानिक नागरिकांना नाल्यात महिलेचा मृतदेह दिसल्यानंतर त्यांनी याबाबत पोलिसांना तातडीनं कळवलं. या घटनेची माहिती मिळताच परिसरात मोठ्या संख्येने नागरिकांची गर्दी झाली होती.अचानक घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.ही महिला कोण आहे आणि तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.
काही दिवसांपासून पती-पत्नी निवाऱ्यात राहायचे अन्...
स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार,काही दिवसांपासून पती-पत्नी पोलिसांकडून उभारण्यात आलेल्या निवाऱ्यात राहत होते.हे दाम्पत्य नेमके कुठून आले आणि त्यांची ओळख काय? याबाबत स्थानिकांनाही फारशी माहिती नाही. दरम्यान, आज अचानक त्या महिलेचा मृतदेह नाल्यात आढळल्याने सर्वांना धक्का बसला आहे. महिलेचा मृत्यू अपघाती आहे की त्यामागे काही वेगळे कारण आहे? याबाबतही विविध चर्चा सुरू आहेत.या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण असून पोलिसांकडून या प्रकरणाचा बारकाईने तपास सुरू करण्यात आला आहे.
नक्की वाचा >> राज्यातील हॉटेल व्यवसायिकांसाठी आनंदाची बातमी! LPG Gas पुरवठ्याबाबत सरकारने घेतला सर्वात महत्त्वाचा निर्णय
पोलिसांचा तपास सुरू; मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला
घटनेची माहिती मिळताच डाबकी रोड पोलीस स्टेशनचे ठाणेदार दीपक कोळी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.त्यानंतर मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
नक्की वाचा >> LPG Gas Cylinder Video : सिलिंडर रिकामा आहे की भरलेला? 2 कोटी लोकांनी पाहिली गॅस तपासण्याची 'ही' अनोखी पद्धत
शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.या ठिकाणी उभारण्यात आलेल्या निवाऱ्याचा काहीजण गैरवापर करत असल्याची तक्रार स्थानिकांकडून करण्यात येत आहे. यावर मनपा स्वीकृत नगरसेवक आकाश कवडे यांनी तातडीने या निवाऱ्याचा योग्य उपयोग करावा किंवा तो हटवावा,अशी मागणी मनपाकडे केली आहे. सध्या या घटनेचा पुढील तपास डाबकी रोड पोलीस स्टेशनकडून सुरू आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world