Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगरहून एक टेन्शन वाढवणारी घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरातील जालना रोडवरील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये एक महिला गेल्या सहा महिन्यांपासून वास्तव्यास आहे. या महिलेचं नाव कल्पना त्र्यंबकराव भागवत (४५) असं आहे.
धक्कादायक बाब म्हणजे 10 किमी अंतरावर असलेल्या पडेगावात महिलेचं घर असल्याचं सांगितलं जात आहे. सिडको पोलिसांनी संशयाच्या आधारे कारवाई करत खोलीची झडती घेतली असता महिलेच्या बॅगेत २०१७ च्या यूपीएससी निवड यादीची प्रत आढळली, ज्यात तिचे नाव ३३३ व्या क्रमांकावर होते. तिच्या आधार कार्डवरही खाडाखोड केल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. याशिवाय तिचं सहा महिन्यांपासून इथं राहण्याचं कारण विचारलं असता ती उडवाउडवीची उत्तरं देत होती.
नक्की वाचा - Crime News :शरीर संबंधादरम्यान अडचण...; उपचार घेताना सॉफ्टवेअर इंजिनियरच्या शरीरात भयंकर घडलं, 48 लाखही बुडाले
चौकशीदरम्यान धक्कादायक प्रकार उघड...
सिडको पोलिसांनी तिची चौकशी केली असता अनेक धक्कादायक गोष्टी आढळल्या. तिच्या बँक खात्यात अफगाणिस्तानातील बॉयफ्रेंड अशरफ खलील आणि पाकिस्तानातील त्याचा भाऊ आवेद यांच्या खात्यांतून मोठी रक्कम आल्याचे समोर आलं. दोघांचे पासपोर्ट, व्हिसा आणि भारतात येण्याच्या अर्जाचे फोटोही तिच्या मोबाइलमध्ये आढळले. संपूर्ण प्रकरण अत्यंत संशयास्पद ठरल्याने एटीएस आणि आयबीकडून महिलेची कसून चौकशी सुरू आहे.
कशी मिळाली टीप?
शनिवारी २२ नोव्हेंबरला पोलिसांना एक टीप मिळाली होती. यानुसार जालना रोडवरील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये एक महिला गेल्या ६ महिन्यांपासून राहत आहे आणि तिच्या कागदपत्रांमध्ये गोंधळ आहे. पोलिसांनी हॉटेलावर छाड टाकली. यावेळी तिच्या आधारकार्डात फेरफार झाल्याचं स्पष्ट दिसून येत आहे. दरम्यान महिलेला ताब्यात घेऊन चौकशी सुरू आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
