जाहिरात
This Article is From May 17, 2024

एकमेकांमध्ये बघण्यावरुन तरुणाची हत्या; पुण्यातील धक्कादायक घटना

श्रीनिवास शंकर वत्सलावर (वय 22 वर्ष) असं खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. घटना घडल्यानंतर अवघ्या 24 तासाच्या आत अलंकार पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकाने सर्व आरोपींना आता अटक केली आहे. 

एकमेकांमध्ये बघण्यावरुन तरुणाची हत्या; पुण्यातील धक्कादायक घटना

प्रतीक्षा पारखी, पुणे

एकमेकांकडे बघण्याच्या किरकोळ कारणावरुन सहा जणांनी मिळून एकाची हत्या करण्यात आली आहे. गुरुवारी रात्री 11.30 च्या सुमारास डहाणूकर कॉलनीत हा सगळा धक्कादायक प्रकार घडला आहे. तरुणावर कोयत्याने वार करून त्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

श्रीनिवास शंकर वत्सलावर (वय 22 वर्ष) असं खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. घटना घडल्यानंतर अवघ्या 24 तासाच्या आत अलंकार पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकाने सर्व आरोपींना आता अटक केली आहे. 

(नक्की वाचा- धक्कादायक! 8 वर्षीय चिमुकलीवर घरात घुसून 65 वर्षीय वृद्धाचा अत्याचार)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  एक महिन्यापूर्वी कर्वेनगर येथे मयत आणि आरोपींमध्ये एकमेकांकडे बघण्यावरून वाद झालेला होता आणि त्याचाच बदला घेण्यासाठी काल आरोपींनी मयताचा पाठलाग करून त्याच्यावर कोयत्याने वार करून खून केला. सहा जणांनी या तरुणावर कोयत्याने वार करून त्याचा निर्घृणपणे खून केला. पुण्यातील कोथरूड परिसरात गुरुवारी मध्यरात्री या तरुणाची कोयत्याने वार करत निघृणपणे हत्या करण्यात आली आहे. 

(नक्की वाचा- पुण्यात घृणास्पद कृत्य! पत्नीच्या गुप्तांगाला कुलूप लावलं; चावी हरवल्याने किळसवाणा प्रकार उघड)

श्रीनिवास हा त्याच्या काही मित्रांसोबत रात्री बाराच्या सुमारास बाहेर गेला होता. यावेळी कर्वेनगर येथील गांधी चौक परिसरात त्याला चार ते पाच जणांच्या टोळीने अडवले व त्याच्यावर कोयत्याने सपासप वार केले. श्रीनिवाससोबत असणारा एक त्याचा मित्र तेथून पळून गेला. मात्र श्रीनिवास तेथेच रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी त्याला जवळपास असणाऱ्या खाजगी दवाखान्यात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: