Kalyan News : कल्याणच्या मलंग रस्त्यावरुन जायला घाबरतायेत प्रवासी, रात्रीच्या 'त्या' घटनेने परिसरात खळबळ

पुण्यातील कोयत्या गँगच्या दहशतीनंतर कल्याणमध्येही असाच एक प्रकार समोर आला आहे.

जाहिरात
Read Time: 1 min

अमजद खान, प्रतिनिधी

Kalyan News : पुण्यातील कोयत्या गँगच्या दहशतीनंतर कल्याणमध्येही असाच एक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कल्याणमधील मलंग रोड चेतना परिसरात ही घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. या व्हिडिओमध्ये हा तरुण दारूच्या नशेत कोयत्याने दहशत पसरवण्याचा प्रयत्न करीत आहे. कोयता हातात घेऊन तरुणाने मध्यरात्री भर रस्त्यात धिंगाणा घातला. 

कल्याणमधील धक्कादायक प्रकार

कल्याण पूर्वत गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असून पोलिसांचे भयच उरलं नसल्याचं दिसून येत नाही. कल्याण पूर्व मलंग रोड चेतना नाका परिसरात एक तरुण मद्यधुंद अवस्थेत हातात कोयता आणि धारदार शस्त्र घेऊन फिरतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा तरुण येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांवर कोयता उगारत असताना दिसत आहे.

नक्की वाचा - Latur News : 'काळी आई'साठी राबताना जीवाभावाच्या मित्रांचा मृत्यू, कारण समोर येताच राज्यभरातील शेतकरी हादरले

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कल्याण पूर्व येथील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शनिवारी मध्यरात्रीचा हा व्हिडिओ असल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान याप्रकरणी कोळशेवाडी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Advertisement