जाहिरात

Latur News : 'काळी आई'साठी राबताना जीवाभावाच्या मित्रांचा मृत्यू, कारण समोर येताच राज्यभरातील शेतकरी हादरले

लातूर जिल्ह्यातील एका गावात दोन जीवाभावाच्या शेतकरी मित्रांनी काळ्या आईसाठी राबत असताना दुर्देवी मृत्यू झाला.

Latur News : 'काळी आई'साठी राबताना जीवाभावाच्या मित्रांचा मृत्यू, कारण समोर येताच राज्यभरातील शेतकरी हादरले

विष्णू बुरगे, प्रतिनिधी

Latur News : लातूर जिल्ह्यातील चाकुर तालुक्यातील अजनसोंड ग्रामपंचायती हद्दीत आज एक हृदयद्रावक घटना घडली आहे. येथील दोन जीवाभावाच्या मित्रांचा एकत्रच मृत्यू झाला आहे. दोघेही आपल्या शेतात काम करीत होते. मात्र यादरम्यान असं काही घडलं की दोघांनी जीव गमावला. 

शेतात काम करताना दोन जीवाभावाच्या मित्रांचा मृत्यू

लातूर जिल्ह्यातील चाकुर तालुक्यातील अजनसोंड ग्रामपंचायती हद्दीतील एका गावात अंगद भालेराव आणि लिंबाजी गवळे हे दोघेही गावात कष्ट, निष्ठा आणि मैत्रीचं प्रतीक म्हणून ओळखली जातात. वर्षाचे बारा महिने, ऊन-पाऊस न पाहता शेती आणि मजुरीसाठी हे दोघेही एकत्र राबत असतात. त्या दिवशीही दोघे शेतात राबत होते. 'काळी आई'ची सेवा करीत असताना या शेतकरी मित्रांचा मृत्यू झाला. ही घटना काही वेळात गावभर पसरली.  दोन मित्रांच्या निधनाने गावभरात शोक व्यक्त केला जात आहे.

Farmers News:'ही' पिकं घ्या अन् खात्यात 50 हजार मिळवा; 'लाडक्या शेतकऱ्यां'साठी सरकारकडून नव्या उपक्रमाची घोषणा

नक्की वाचा - Farmers News:'ही' पिकं घ्या अन् खात्यात 50 हजार मिळवा; 'लाडक्या शेतकऱ्यां'साठी सरकारकडून नव्या उपक्रमाची घोषणा

शेतकऱ्यांसोबत नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, दोघेही आपल्या शेतात तृणनाशकाची फवारणी करत होते. फवारणीदरम्यान विषारी औषध हवेत मिसळले आणि त्यांच्याच श्वासावाटे ते शरीरात गेलं. त्यानंतर काही तासातच त्यांची तब्येत बिघडली. दोघांनाही उलटी, मळमळ आणि श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे दिसू लागली. यानंतर दोघांनाही तातडीने वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आलं. अंगद भालेराव यांचा उपचारादरम्यान लातूरच्या बाहेती हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. तर लिंबाजी गवळे यांनी लातूरच्या शासकीय रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. दोघांच्या मृत्यूची वेळही जवळपास एकच असल्याने कुटुंबीयांवर आणि गावकऱ्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

अजनसोंड गावात हळहळ आणि शोककळा पसरली आहे. जिवाभावाचे दोन मित्र आयुष्यभर एकत्र लढले, आणि अखेर मृत्यूनेही त्यांना एकत्रच नेले. हीच गोष्ट सर्वांच्या डोळ्यात पाणी आणणारी ठरली आहे. शोकाकुल वातावरणात दोघांचेही अंत्यसंस्कार करण्यात आले असून या घटनेने पुन्हा एकदा शेतकरी सुरक्षिततेचे प्रश्न अधोरेखित झाले आहेत.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com