Pune News : 'मी योग्यतेची...' नोट लिहून तरुणीने 9 व्या मजल्यावरुन मारली उडी, बुधवार पेठेतील भयंकर घटना

पुण्यातील बुधवार पेठ भागात गुरुवार २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी एका तरुणीने ९ व्या मजल्यावरुन उडी मारून स्वत:चं जीवन संपवलं.

जाहिरात
Read Time: 2 mins

Pune News : पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला होता. पुण्यातील बुधवार पेठ (Pune Budhwar Peth) भागात गुरुवार २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी एका तरुणीने ९ व्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. तोपर्यंत ही तरुणी कोण आहे याबाबत काहीच कळू शकत नव्हतं. दरम्यान या प्रकरणात एक मोठी माहिती समोर आली आहे.

नवव्या मजल्यावरुन मारली उडी...

पुण्यात आत्महत्या केलेल्या तरुणीची ओळख पटली असून तिची सुसाइड नोट देखील सापडली आहे. या सुसाइड नोटमध्ये तरुणीनं आत्महत्येच कारण सांगितलं आहे. वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी तरुणींन जीवन संपवलं. यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. तिने सुसाइड नोटमध्ये मोठा खुलासा केला आहे. "मी घरातल्या लोकांच्या योग्यतेची नाही" असं म्हणत त्या तरुणीने टोकाचं पाऊल उचललं.

नक्की वाचा - Pune News : अगं बेबी, बाळा, पिल्लू, टिल्लू..., मराठीतील जाहिरातीवर पुणेकर संतापले, सोशल मीडियावर घमासान चर्चा

"मी घरातल्या लोकांच्या योग्यतेची नाही"

"मी घरातल्या लोकांच्या योग्यतेची नाही. कामाचा कंटाळा केल्याने स्वतःहून हे टोकाचे पाऊल उचलून आत्महत्या करीत आहे" अशा आशयाची सुसाईड नोट लिहित तरुणीने इमारतीच्या टेरेस वरून उडी मारली. काल २७ नोव्हेंबरला संध्याकाळी पुण्यातील बुधवार पेठ परिसरात तरुणीने आत्महत्या केली होती. मानसी भगवान गोपाळघरे अस आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाव आहे. 

Topics mentioned in this article