जाहिरात
This Article is From May 13, 2024

ही चूक महागात पडली! कुलरचा शॉक लागल्याने तरुणाचा मृत्यू; अकोल्यातील तिसरी घटना!

कुलरमध्ये पाणी भरताना किंवा सुरू करताना अधिक सावध राहणं आवश्यक आहे.

ही चूक महागात पडली! कुलरचा शॉक लागल्याने तरुणाचा मृत्यू; अकोल्यातील तिसरी घटना!
अकोला:

उकाडा वाढत असल्यामुळे एसी आणि कुलरचाही वापर वाढला आहे. दरम्यान अकोल्यातून एक धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. कुलरचा शॉक लागून एकाचा मृत्यू झाला आहे. अकोला जिल्ह्यातील मळसुर गावात ही दुःखद घटना घडली आहे. कुलर सुरू करत असताना जोरदार विजेचा झटका लागताच तरुणाचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत 38 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. नितीन गजानन वानखडे असं शॉक लागून मरण पावलेल्या व्यक्तीचं नाव आहे. या घननेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

कुलरमध्ये पाणी भरताना किंवा सुरू करताना अधिक सावध राहणं आवश्यक आहे. अकोल्यामुळे कुलरमध्ये पाणी भरताना नितीन वानखडे या तरुणाना विजेचा धक्का बसला आणि त्याचा मृत्यू ओढवला. आतापर्यंत 7 वर्षीय चिमुकलीसह एका पोलिसाला कुलरमुळे जीव गमवावा लागला आहे. नितीन गजानन वानखडे (38) कामावरुन घरी परतले होते, त्यावेळी घरातील कूलर बंद पडले म्हणून त्यांनी कूलर सुरू करायचा प्रयत्न केला. कूलरला स्पर्श करताच त्यांना विजेचा धक्का बसला व कूलर त्यांच्या अंगावर पडला. ही घटना त्यांचे वडील व पत्नीच्या लक्षात येताच त्यांनी विद्युत पुरवठा खंडित केला आणि ग्रामस्थांच्या मदतीच्या त्यांना उपचारासाठी तातडीने हलवण्यात आलं. माक्ष अकोल्याला पोहोचण्यापूर्वी वाटेतच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी व दोन लहान मुले असा परिवार आहे.

नक्की वाचा - कुटुंबानेच आखला सरपंचांच्या खूनाचा कट; हत्येचा बनाव पाहून पोलीसही हैराण!

काही दिवसांपूर्वी कुलरमुळे दोघांचा मृत्यू...
काही दिवसांपूर्वी पाणी भरताना भिंतीवरील वायरला स्पर्श झाल्यानं जोरदार विजेचा धक्का लागल्याने पोलीस दलातील अंमलदार गणेश रामराव सोनोने यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. दुसऱ्या घटनेत अकोला शहरातील युक्ती अमोल गोगे या चिमुकलीचा मृत्यू झाला होता. युक्ती घरात खेळत असताना कूलरजवळ गेली आणि विजेचा धक्का लागल्याने या मुलीचा जागेवरच मृत्यू झाला होता. दरम्यान कूलरला असलेल्या बटनांची एक वायर कापली गेली होती.  त्यामधील करंट कूलरच्या जाळीला लागला. संपूर्ण कूलरमधून विजेचा प्रवाह सुरू असतानाच युक्तीचा हात कूलरला लागला होता, त्यातून ही दुर्घटना घडली होती. आता पुन्हा कूलरचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही अकोल्यातील तिसरी घटना आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com