लोकसभा पराभवानंतर भाजपचा अ‍ॅक्शन प्लान तयार, 'या' नेत्यांवर मोठी जबाबदारी

लोकसभा निवडणुकीत विशेषत: महाराष्ट्रात भाजपला मोठा फटका सहन करावा लागला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

लोकसभा निवडणुकीत विशेषत: महाराष्ट्रात भाजपला मोठा फटका सहन करावा लागला आहे. लोकसभा निवडणूक 2024 मध्ये भाजपने 28 जागा लढवल्या होत्या, मात्र त्यातील 9 जागांवरच भाजपला यश मिळू शकलेले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतरही भाजपला या निवडणुकीत अपेक्षित फायदा झाला नसल्याचं दिसून येत आहे. लोकसभेतील पराभवानंतर भाजपने अॅक्शन प्लान तयार केला आहे. राज्यातील पराभूत मतदारसंघातील कारणांचा आढावा घेतला जाणार आहे. या लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या प्रमुख नेत्यांच्या मतदारसंघात जाऊन पराभवाची कारणे शोधण्याची जबाबदारी पक्षातील वरिष्ठ नेत्यांना देण्यात आली आहे. होमग्राऊंड राखू न शकलेल्या विखे पाटलांवर नांदेडच्या विश्लेषणाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी भाजपकडून तयारी केली जात आहे. 

लोकसभा निवडणुकीत महायुतीपैकी भाजपने 28, शिंदे गटाने 15 आणि अजित पवार गटाने 4 जागा लढवल्या होत्या. त्यातील भाजपला 9, शिंदे गटाला 7 आणि अजित पवार गटाला एकाच जागावर विजय राखला आला. महायुतीने गमावलेल्या 33 मतदारसंघांचा यानिमित्ताने आढावा घेतला जाणार आहे. याशिवाय जिंकलेल्या जागांवरही भाजपकडून निरीक्षक पाठविण्यात आले आहेत. 22 जूनपर्यंत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पक्षश्रेष्ठींना हा अहवाल द्यावा लागणार आहे. बीडची जबाबदारी संभाजी पाटील निलंगेकर यांच्याकडे, बारामती मंगलप्रभात लोढा तर श्रीकांत भारतीय हे चंद्रपुरचा आढावा घेणार असल्याचे समजते.  

Advertisement

नक्की वाचा - शरद पवार की उद्धव ठाकरे, विधानसभेत कोण लढवणार पुण्यातील सर्वाधिक जागा?

कोणत्या नेत्यांवर अहवाल तयार करण्याची जबाबदारी 

जालना - चंद्रकांत पाटील
रामटेक - खा. अनिल बोंडे
अमरावती - आशिष देशमुख
वर्धा - आ. प्रवीण दटके
भंडारा-गोंदिया - रणजीत पाटील
यवतमाळ-वाशिम - आ. आकाश फुंडकर, 
दिंडोरी - विजयाताई रहाटकर,
हिंगोली- आ. संजय कुटे, 
उत्तर-पश्चिम मुंबई - सुनील कर्जतकर,
दक्षिण मुंबई - माधवी नाईक, 
उत्तर-मध्य मुंबई- हर्षवर्धन पाटील,
उत्तर-पूर्व मुंबई - आ. राणा जगजितसिंह, 
मावळ - आ. प्रवीण दरेकर
अहमदनगर- खा. मेधा कुलकर्णी,
माढा - आ. अमित साटम, 
भिवंडी - गोपाळ शेट्टी

Advertisement