जाहिरात

Maharashtra Assembly Election 2024 : 'या' पक्षाकडून विधानसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर

Maharashtra Assembly Election 2024  : आगामी विधानसभा निवडणुकीसाठा 5 उमेदवारांची यादी AIMIM नं जाहीर केली आहे.

Maharashtra Assembly Election 2024 : 'या' पक्षाकडून विधानसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर
Assembly Election 2024 : दिवाळीनंतर नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे.
छत्रपती संभाजीनगर:

Maharashtra Assembly Election 2024  : आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. दिवाळीनंतर नोव्हेंबर महिन्यात या निवडणुका होण्याची शक्यता आहे. या निवडणुकांसाठी पक्षातील इच्छूक उमेदवार मतदारसंघात दौरे करत आहेत. त्याचबरोबर राजकीय पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांच्याही बैठका सुरु आहेत. या सर्व घडामोडी घडत असताना आजवर कोणत्याही पक्षानं उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केली नव्हती. ऑल इंडिया मंजलीस ए इत्तेहादूल मुस्लिमन (AIMIM) पक्षानं या विषयावर आघाडी घेत विधानसभा निवडणुकीची पहिली यादी जाहीर केली आहे.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

AIMIM पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी छत्रपती संभाजीनगरमधील पत्रकार परिषदेत 5 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. 2014 साली झालेल्या निवडणुकीत या पक्षानं 2 जागा जिंकत राज्याच्या विधानसभेत प्रवेश केला होता. सध्याच्या विधानसभेत त्यांचा एक आमदार आहे.

जलील यांना उमेदवारी

ओवेसी यांनी या पत्रकार परिषदेत AIMIM पक्षाचा महाराष्ट्रातील प्रमुख चेहरा असलेल्या इम्तियाज जलील ( Imtiaz Jaleel) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. जलील यांनी पत्रकारितेमधून राजकारणात प्रवेश केला. 2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले. त्यानंतर 2015 साली झालेल्या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीतही त्यांच्या नेतृत्त्वाखाली पक्षानं 25 जागा जिंकल्या होत्या. 

Manoj Jarange Patil : 'भाजपातील स्फोट तुम्हाला दिसेल, पक्षातील मराठा...' जरांगेंचा नवा आरोप

( नक्की वाचा : Manoj Jarange Patil : 'भाजपातील स्फोट तुम्हाला दिसेल, पक्षातील मराठा...' जरांगेंचा नवा आरोप )

जलील यांनी त्यानंतर 2019 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत संभाजीनगर मतदारसंघातून विजय मिळवला होता. शेवटच्या फेरीपर्यंत रंगतदार ठरलेल्या त्या निवडणुकीत जलील यांनी शिवसेनेच्या चंद्रकांत खैरेंवर य4492 मतांनी निसटता विजय मिळवला. AIMIM पक्षाच्या 9 दशकांच्या इतिहासात पहिल्यांदाच हैदराबाद शहराच्या बाहेर त्यांचा खासदार निवडून आला होता. 

यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र त्यांच्या विजयी घौडदौडीला ब्रेक लागला. शिवसेनेच्या संदीपान भुमरे यांच्याकडून ते पराभूत झाले. या पराभवानंतर पक्षानं त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवत विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली आहे.

राहुल गांधींची अमेरिकेतून RSS वर वादग्रस्त टीका, भाजपानं दिलं इंदिरा गांधींचा दाखला... प्रकरण काय?

( नक्की वाचा : राहुल गांधींची अमेरिकेतून RSS वर वादग्रस्त टीका, भाजपानं दिलं इंदिरा गांधींचा दाखला... प्रकरण काय? )

AIMIM नं जाहीर केलेल्या उमेदवारांची यादी 

  • मुफ्ती इस्माईल - मालेगाव ,
  • फारूक शाब्दी - सोलापूर 
  • रईस लष्करी - मुंबई 
  • फारूक शाह - धुळे
  • इम्तियाज जलील - छत्रपती संभाजीनगर

AIMIM ची रणनीती काय?

राज्यातील मुस्लीमबहुल विधानसभा मतदारसंघांना टार्गेट करणे हे AIMIM पक्षाचं जुनं धोरण आहे. त्यांनी पहिल्या यादीतही हेच धोरण जपलं आहे. या पक्षांच्या मिळणाऱ्या उमेदवारांमुळे मतविभागणी होणार का? या मतविभागणीचा फायदा आणि फटका कुणाला बसणार हे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होईल.

Switch To Dark/Light Mode
Previous Article
Manoj Jarange Patil : 'भाजपातील स्फोट तुम्हाला दिसेल, पक्षातील मराठा...' जरांगेंचा नवा आरोप
Maharashtra Assembly Election 2024 : 'या' पक्षाकडून विधानसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर
mahayuti-25-seats-friendly-fight-Amit-shah-Eknath-shinde-Ajit-pawar-meeting
Next Article
महायुतीत 25 जागांवर फ्रेंडली फाईट? शहा- शिंदे- पवारांत काय ठरलं?