'कुंकू लावायचे असेल तर एकाचेच लावा'; अजित पवारांचा कार्यकर्त्यांना सज्जड दम

उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
बारामती:

उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत. यावेळी बारामती तालुक्यातील शिर्सुफळ येथे सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेत अजित पवारांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. 

यावेळी अजित पवार म्हणाले, जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायचं नाही. काहीजण माझी सभा झाली रे झाली की, समोरच्या पार्टीकडे जातात. बिनविरोध मी पदे दिली आणि प्रचार मात्र त्यांचा करत आहेत. कुंकू लावायचा असेल तर एकाचाच लावा. माझा तरी लावा नाहीतर त्यांचा तरी लावा, अशा शब्दात सज्जड दम भरला. पुढे अजित पवार म्हणाले, हे झाकून राहत नाही. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सुद्धा असंच झालं होतं. त्यावेळीही याबद्दल मला कळलं होतं. परंतू जुन्या गोष्टी आता उकरून काढायच्या नाहीत असं मी ठरवलं आहे. 

ते वाक्य वापरताना अजित पवार यांनी आमदार रोहित पवार यांचा संदर्भ दिला आणि ते म्हणाले की उद्या कदाचित ते बोलतील अजितदादा दम द्यायला लागलेत. पण मी माझ्या कार्यकर्त्यांना दम देतोय.  अशा स्वरूपात अप्रत्यक्षरित्या रोहित पवार यांना त्यांनी टोला लगावला. याबाबत बोलतानाच त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील नेते देशमुख यांच्या उपोषणाचा संदर्भ दिला. त्यांना उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. 

नक्की वाचा - पंकजा मुंडेंच्या खुर्चीसाठी जरांगे पाटलांच्या सूचना; दोघेही एकाच व्यासपीठावर, निमित्त होतं..

सुनेत्रा पवार यांना मत देताना भावनिक होऊ नका असं आव्हान कार्यकर्त्यांना केलं. सून ही घराची लक्ष्मी असते, एकावेळेनंतर सासू सुनेला घराची संपूर्ण जबाबदारी देत असते.चाळीस वर्षापूर्वी तुमच्या घरात आलेल्या सूनेला मत द्यायचं की मुलीला द्यायचं हे तुम्हीच ठरवा. आईच्या पोटातून कोणीच शिकून येत नाही. मलाही सुरुवातील भाषणं येत नव्हते. भाषणाला उभं राहताना लटलट पाय कापायचे. पण  मी शिकलो. याचा विचार तुम्ही करा, असंही पवार यावेळी म्हणाले. 

Advertisement