दादांची 'दादागिरी'! 'गंमत-जंमत कराल तर याद राखा, तुमचा बंदोबस्तच करेन'

याद राखा, तुमचा बंदोबस्त करेन अशा शब्दात त्यांनी कार्यकर्त्यांना थेट धमकीच दिली आहे. मावळचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी अजित पवारांनी जाहीर सभा घेतली. त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना कडक शब्दात सुनावले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
पिंपरी चिंचवड:

अजित पवार हे आपल्या वक्तव्यांनी नेहमीच चर्चेत असतात. तर त्यांच्या स्पष्टवक्ते पणमुळे ते कधी कधी अडचणीतही येतात. आता त्यांच्या एका वक्तव्याची जोरदार चर्चा आहे. त्यांनी जाहीर सभेतच आपल्या कार्यकर्त्यांना सज्जड दम दिला. याद राखा, तुमचा बंदोबस्त करेन अशा शब्दात त्यांनी कार्यकर्त्यांना थेट धमकीच दिली आहे. मावळचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी अजित पवारांनी जाहीर सभा घेतली. त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना कडक शब्दात सुनावले आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अजित पवारांची थेट धमकी 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा बालेकिल्ला म्हणून पिंपरी चिंचवडची ओळख आहे. मात्र शहरातील गावकी भावकीच्या राजकारणाशी अजित पवार परिचित आहेत. यंदा ही त्याचा फटका  महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे बसू शकतो, म्हणून अजित पवारांनी पिंपरीतील  जाहीर सभेत आपल्या कार्यकर्त्यांना सज्जड दम दिलाय. आपल्या भाषणात बोलताना त्यांनी कोणी गंमत-जंमत करण्याचा प्रयत्न करू नये. कोण गंमत जंमत करतो ते आम्हाला लगेच कळतं. जर का कुणी गंम्मत जम्मत केली, तर मी तुमचा बंदोबस्त करेन. मॅच फिक्सींग करायची नाही. काही करून श्रीरंग बारणेंचे काम आपल्याला करायचे आहे अशा शब्दात त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सुनावले. 

हेही वाचा - सभांचा धडाका! मोदी, राज, उद्धव ठाकरे आजचा दिवस गाजवणार

निमित्त काय घडलं?   

पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या मुलीच्या लग्नाला अजित पवारांनी उपस्थिती लावली होती. त्याच लग्नाला श्रीरंग बारणे यांच्या विरोधात उभे असलेले आणि एकेकाळचे अजित पवारांचे समर्थक संजोग वाघेरे हे त्या ठिकाणी होते. अजित पवार आल्यानंतर वाघेरे अजित पवारांच्या पाया पडले. त्याचे फोटो ही काढण्यात आले. त्यानंतर हे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. अजित पवारांनी वाघेरे यांना आशिर्वाद दिले असा प्रचार सुरू झाला. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्येही संभ्रम निर्माण झाला. ही बाब अजित पवारांच्या लक्षात आली. त्यामुळेच त्यांना कार्तकर्त्यांना दम द्यावा लागला. शिवाय श्रीरंग बारणे यांना विजयी करण्याचे आवाहन ही केले. 

हेही वाचा - नरेंद्र दाभोलकर हत्याकांड प्रकरणात आज निकाल, 11 वर्षांनंतर तरी न्याय मिळणार?

मावळमध्ये अटीतटीची लढत

मावळ लोकसभा मतदार संघात शिवसेना शिंदे गटाचे श्रीरंग बारणे आणि शिवसेना ठाकरे गटाचे संजोग वाघेरे यांच्यात थेट लढत होत आहे. संजोग वाघेरे हे एकेकाळचे अजित पवार यांचे कट्टर समर्थक होते. पिंपरी चिंचवडमध्ये त्यांची मोठी ताकद आहे. तर बारणेंच्या मागे महायुतीची ताकद आहे. पण त्यांना अजित पवारांच्या पाठींब्याचीही गरज आहे. त्यामुळेच अजित पवारांनी त्यांच्यासाठी सभा घेतली.  

Advertisement