राणेंसाठी अमित शहा मैदानात, कोकणात ठाकरे बंधुंच्या सभांचाही तडका

अमित शहा रत्नागिरीत सभा घेत आहेत. त्यांची सभा झाल्यानंतर उद्धव ठाकरे हे सिंधुदुर्गात आजच सभा घेतील. तर उद्या (शनिवारी) राज ठाकरे हे कणकवलीत सभा घेणार आहेत. त्यामुळे राजकीय सभांचा धडाका कोकणात असणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
रत्नागिरी:

कोकणात सध्या लोकसभा निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. त्यात रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात चुरशीची लढत होत आहे. इथे भाजपकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना ठाकरे गटाकडून विनायक राऊत रिंगणात आहेत. या दोघांसाठीही पक्षाचे बडे नेते मैदानात उतरले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे रत्नागिरीत जाहीर सभा घेत आहेत. दुपारी ही सभा होणार आहेत. तर ही सभा संपल्यानंतर संध्याकाळी उद्धव ठाकरेंची तोफ ही राणेंच्या गडात म्हणजे कणकवलीत धडाडणार आहे. एक ठाकरेंची सभा संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी दुसरे ठाकरे म्हणजे राज हे ही सिंधुदुर्गात सभा घेणार आहे. त्यामुळे राजकीय सभांचा धडाका कोकणात असणार आहे.   

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अमित शहांची रत्नागिरीत सभा 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे रत्नागिरीत जाहीर सभा घेत आहेत. दुपारी एक वाजता ही सभा होणार आहे. रत्नागिरी शहरातील गोगटे - जोगळेकर कॉलेजच्या जवाहर मैदानावर ही सभा होणार आहे. या सभेची सर्व तयारी पुर्ण झाली आहे. सभे निमित्त नारायण राणे मोठं शक्तीप्रदर्शन करणार आहेत. शिवाय यावेळी अमित शहा कोणावर निशाणा साधतात याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. शहा रत्नागिरी बरोबरच सांगलीतही एक सभा घेणार आहेत.

Advertisement

हेही वाचा - बीड लोकसभा : मुंडेंच्या गडाला पवार हादरा देणार का?

उद्धव ठाकरे कणकवलीत 

अमित शहा यांची सभा झाल्यानंतर संध्याकाळी उद्धव ठाकरेही राणेंचा गड मानल्या जाणाऱ्या कणकवलीत सभा घेणार आहे. राणेंना त्यांच्याच गडात यानिमित्ताने ठाकरे आव्हान देतील. त्या आधी अमित शहा यांची सभा रत्नागिरीत होत आहे. त्याला ठाकरे आपल्या खास शैलीत कसे उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवाय आमच्या नेत्यांवर काही बोललात तर परत जाण्याचा रस्ता रोखू असा इशारा या आधीच राणे यांनी दिला आहे. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले होते. त्यामुळे ठाकरें राणेंच्या या इशाऱ्याला कशा पद्धतीने उत्तर देतात त्याबाबतही उत्सुकता आहे. विनायक राऊत यांना शिवसेना ठाकरे गटाने या मतदार संघात उमेदवारी दिली आहे. ते विजयाची हॅट्रीक करण्यासाठी उत्सुक आहेत. 
   
राज ठाकरेही राणेंच्या प्रचाराला 

Advertisement

राज ठाकरे यांनी महायुतीला आपला पाठींबा देऊ केला आहे. त्यामुळे तेही कोकणात नारायण राणे यांच्या प्रचारासाठी सिंधुदुर्गात येणार आहे. उद्धव ठाकरे यांची सभा झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे शनिवारीही सभा कणकवली आयोजित करण्या आली आहे. त्यामुळे राज उद्धव यांना या सभेतून काय प्रत्युत्तर देणार हेही पहावं लागणार आहे.  कोकणात होणाऱ्या या बॅक टू बॅक सभा मुळे राजकीय वातावरण मात्र चांगलेच तापणार आहे. 

Advertisement