जाहिरात
Story ProgressBack

'अमोलदादा तब्बल 5 वर्षानंतर गावात तुमचं स्वागत' त्या बोर्डची सर्वत्र चर्चा

Read Time: 2 min
'अमोलदादा तब्बल 5 वर्षानंतर गावात तुमचं स्वागत' त्या बोर्डची सर्वत्र चर्चा
शिरूर:

लोकसभेच्या निवडणुकीचं वातावरण चांगलचं तापलं आहे. आरोप - प्रत्यारोप होत आहेत. उमेदवारांनी मतदारांचा रोषही सहन करावा लागत आहे. तर काही ठिकाणी त्यांचे स्वागतही होत आहे. पण शिरुर लोकसभेत एक बॅनर सध्या चांगलाच चर्चेत आहे. हा बॅनर लागला आहे तो खासदार अमोल कोल्हे यांच्यासाठी. बॅनरवरचा मजकूर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. त्यामुळेच याबॅनरची चर्चा संपुर्ण शिरूर लोकसभेत होत आहे. 

बॅनरवर नेमकं काय?   
शिरूर लोकसभेतून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने डॉ. अमोल कोल्हे यांनी उमेदवारी दिली आहे. सध्या ते प्रचारात आहेत. मात्र एकीकडे त्यांचा प्रचार सुरू असताना दुसरीकडे एक बॅनर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. चाकण जवळच्या रासेगावात हा बॅनर लागला आहे. बॅनरवर 'अमोलदादा तब्बल पाच वर्षानंतर आपले आमच्या गावात सहर्ष स्वागत....! असा मजकूर लिहीण्यात आला आहे. शिवाय खाली आपलाच २०१९ चा विश्वासू मतदार असा उल्लेख करण्यात आला आहे. हा बॅनर ज्या ठिकाणी लावला आहे, तिथे सरकारचा थांबा, पाहा, सावकाश हा बोर्ड आहे. त्याच्या अगदी खाली हा बॅनर झळकत आहे. दरम्यान हा बॅनर कुणी लावला हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. 

शिरूरमध्ये थेट लढत 
शिरुर लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी विरूद्ध राष्ट्रवादी असाच सामना रंगणार आहे. शरद पवार गटाकडून अमोल कोल्हे पुन्हा एकदा मैदानात आहेत. तर अजित पवार गटाकडून आढळराव पाटील पुन्हा एकदा नशिब अजमावत आहे. या मतदार संघात या दोघांमध्ये थेट लढत होत आहे. 2019 च्या निवडणुकीत कोल्हेंनी आढळराव पाटील यांचा पराभव केला होता. दरम्यान ही जागा अजित पवारांनी प्रतिष्ठेची केली आहे. काही करून कोल्हेंचा पराभव करायचा असा चंग त्यांनी केला आहे. तर शरद पवारांनीही कोल्हेंसाठी फिल्डींग लावली आहे. त्यामुळे इथली लढत अटीतटीची होणार हे स्पष्ट आहे. 

कोल्हे समोर आव्हान काय? 
अमोल कोल्हे यांनी दुसऱ्यांदा निवडून येण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. शरद पवारांनीही त्यांच्यासाठी सभा घेतली. प्रत्येक गावागावात पोहचण्याचा कोल्हे यांचा प्रयत्न आहे. तर अजित पवारांनी कोल्हे यांना हरवण्यासाठी काही करण्याची तयारी केली आहे. अजित पवारांनी बंड केल्यानंतर सुरूवातीला कोल्हे अजित पवारांबरोबर दिसले होते. पण नंतर त्यांनी शरद पवारांबरोबर राहण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय अजित पवारांना पटला नाही. त्यामुळे अजित पवारांनी ही बाब वैयक्तीक दृष्ट्या घेतली आहे. हेच मोठे आव्हान कोल्हें समोर असेल.   

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination