Amravati : अमरावतीत काँग्रेसच्या 'व्हिप'चे वाजले 12; दिग्गज नेत्यांच्या नाकाखाली नगरसेवकांनी असा धुडकावला आदेश

Amravati MLC Election 2026: अमरावती विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणाचा धक्कादायक अंक समोर आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Amravati MLC Election 2026 : अमरावतीत काँग्रेसला मोठे खिंडार पडले असून पक्षाची रणनीती पूर्णपणे फेल ठरली आहे.
अमरावती:

शुभम बायस्कार, प्रतिनिधी

Amravati MLC Election 2026: अमरावती विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणाचा धक्कादायक अंक समोर आला आहे. पक्षाने जारी केलेला तटस्थतेचा अधिकृत व्हिप स काँग्रेसच्याच नगरसेवकांनी कचऱ्याच्या डब्यात फेकला.त्यांनी पक्षाचा आदेश उघडपणे धुडकावला. हे नगरसेवक  चेहऱ्याला दुपट्टा बांधून लपून-छपून  मतदान केंद्रावर पोहोचले आणि त्यांनी थेट क्रॉस व्होटिंग केले. दिग्गज नेत्यांच्या नाकाखाली झालेल्या या उघड बंडखोरीमुळे अमरावतीत काँग्रेसला मोठे खिंडार पडले असून पक्षाची रणनीती पूर्णपणे फेल ठरली आहे.

नेमकं काय घडलं?

अमरावतीमध्ये काँग्रेसच्या एकूण 16 नगरसेवकांपैकी तब्बल 6 नगरसेवकांनी पक्षाचा आदेश धाब्यावर बसवून थेट मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये धीरज हिवसे, जयश्री जठाले, लुबना तनवीर, अप्सर जहा सादीक शाह, विकी वानखडे आणि प्रशांत महाले या नगरसेवकांचा समावेश आहे. या सर्व नगरसेवकांनी पक्षाच्या भूमिकेविरोधात जाऊन मतदान केल्याने काँग्रेसचे मोठे नुकसान झाले आहे.

Advertisement

( नक्की वाचा : Shivsena UBT: ठाकरेंची शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होणार होती? फुटीर खासदारांच्या पत्राने राजकीय वर्तुळात भूकंप )

यशोमती ठाकूर यांच्या होमटाऊनमध्येच बंडखोरी

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्या होम टाऊनमध्येच काँग्रेसला हा सर्वात मोठा धक्का बसला आहे. तिवसा नगरपंचायतीमध्ये काँग्रेसच्या एकूण 14 नगरसेवकांपैकी 3 नगरसेवकांनी थेट बंडखोरी करत मतदान केले, तर उर्वरित 11 नगरसेवक तटस्थ राहिले. तिवशामध्ये पक्षादेश धुडकावून मतदान करणाऱ्यांमध्ये वॉर्ड क्रमांक 8 मधील सीमा खाकसे, स्वीकृत नगरसेवक सचिन बोरे आणि वॉर्ड क्रमांक 12 मधील संगीता राऊत यांचा समावेश आहे. 

काँग्रेस उमेदवाराची निवडणुकीकडं पाठ

अमरावती विधान परिषद निवडणूक सुरुवातीपासूनच एकतर्फी मानली जात होती. भाजपचे माजी मंत्री प्रवीण पोटे यांच्या बाजूने ही निवडणूक झुकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. काँग्रेसकडून हर्षजीत देशमुख हे उमेदवार रिंगणात आहेत, तर वंचित बहुजन आघाडीकडून निलेश विश्वकर्मा मैदानात आहेत. मात्र धक्कादायक बाब म्हणजे मतदानाच्या अंतिम क्षणापर्यंत काँग्रेसचे उमेदवार हर्षजीत देशमुख अमरावतीत फिरकलेच नाहीत, ज्यामुळे स्थानिक पातळीवर मोठा गोंधळ उडाला आणि नगरसेवकांनी थेट क्रॉस व्होटिंग केले.

( नक्की वाचा : रात्रीचा तो व्हिडिओ कॉल आणि ठाकरे गटात खिंडार; एकनाथ शिंदेंनी 35 मिनिटांत अशी लिहिली बंडखोरीची स्क्रिप्ट )
 

अमरावती विधान परिषदेचे संपूर्ण पक्षीय बलाबल

या निवडणुकीत एकूण 453 मतदार असून विविध पक्षांचे संख्याबळ खालीलप्रमाणे आहे:

भाजप: 150
काँग्रेस: 120
राष्ट्रवादी: 31
युवा स्वाभिमान पक्ष: 26
शिवसेना: 21
प्रहार: 21
एमआयएम: 16
शिवसेना (ठाकरे गट): 15
राष्ट्रवादी (शरद पवार गट): 14
वंचित बहुजन आघाडी: 5
बसपा: 3
समाजवादी पक्ष: 2
कम्युनिस्ट पक्ष: 1
अपक्ष: 27
 

Topics mentioned in this article