शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची संजय राऊत यांनी खळबळजनक आणि बेधडक मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत त्यांनी अनेक मोठे खुलासे केले आहेत. या मुलाखतीचा पहिला भाग 12 मे रोजी सकाळी 8 वाजता प्रकाशीत केला जाणार आहे. या मुलाखतीत नेमकं काय काय असेल याचा अंदाज देणारा प्रोमो नुकताच प्रकाशीत करण्यात आला आहे. यामुलाखतीत ठाकरेंनी मोदी शहां पासून कब्रस्तान ते पाकीस्तान पर्यंतच्या प्रश्नांना उत्तरं दिली आहेत. विशेष म्हणजे औरंगजेबावरही ते या मुलाखतीत बोलले आहेत. त्यामुळे ठाकरेंच्या या मुलाखतीबाबत उत्सुकता लागली आहे.
निवडणुकांच्या महाभारतात नवे वादळ
संजय राऊत यांनी घेतलेल्या ठाकरेंच्या या रोखठोक मुलाखतीत एकापेक्षा एक प्रश्नांचा भडीराम केला आहे. त्याला तितक्याच सहजतेने उद्धव ठाकरे यांनीही उत्तरं दिलेली आहे. मोदी आणि शहा हे महाराष्ट्रात येत आहेत. त्यांचे पहिल्या क्रमांकाचे टार्गेट हे उद्धव ठाकरे तर दुसरे शरद पवार आहेत. असा प्रश्न संजय राऊत यांनी केला आहे. तर लोकशाही पुर्ण पणे नासवली असून त्याचे वस्रहरण झाल्याचे ठाकरे सांगताना या मुलाखतीत दिसत आहेत.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतलेली खळबळजनक आणि बेधडक मुलाखत, निवडणुकांच्या महाभारतात नवे वादळ...
'रोखठोक मुलाखत'
पहिला भाग रविवार, १२ मे रोजी फक्त https://t.co/ZXocOm3ew7 वर @ShivSenaUBT_ @OfficeofUT @rautsanjay61 pic.twitter.com/a1twm5gkuz
मोदी शहांवर हल्लाबोल
उद्धव ठाकरेंचा अभिमन्यू झाला आहे. असाही प्रश्न राऊत यांनी केला आहे. शिवाय मुसलमान,कब्रस्तान, पाकिस्तान यावर मोदी आता बोलत आहेत अशी विचारणाही राऊत करतात. त्यावर ठाकरे आम्ही फक्त हिंदुस्तानसाठीवर बोलतो असेही ठाकरे सांगत आहे. शिवाय पुलवामा हल्ल्याबाबतही ठाकरे यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. मोदींच्या भ्रष्टाचार मुक्त भारताचाही त्यांनी समाचार घेतला आहे. तर मतं मागताना राम राम करतात आणि नंतर लोकांना मरा मरा म्हणतात असा हल्लाबोल ही ठाकरेंनी या मुलाखतीत केला आहे. निवडणुकींच्या टप्प्या विषयी त्यांना विचारला असता, टप्पा काय त्यांनी सरपटी टाकला तरी ते सरपटणार असे ठाकरे म्हणाले आहेत. मोदींना महाराष्ट्राने दहा वर्षे आशिर्वाद दिला आता शाप काय असतो ते पाहा असेही ते म्हणाले आहेत.
औरंगजेबा बाबत काय म्हणाले?
संजय राऊत यांनी विचारलेल्या एका प्रश्नाकडे सर्वांचेच लक्ष आहे. त्यात ते आपण काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर गेलात. त्यानंतर तुमचे विरोधक 'आपण औरंगजेब फॅन्स क्लबचे मेंबर झालेला आहात?' अशा बोंबा मारत आहेत. या प्रश्नावर ठाकरे यांनी मिश्किल पणे हसताना दाखवले आहेत. त्यांनी या प्रश्नाला नक्की काय उत्तर दिले आहे, याबाबत मात्र उत्सुकता कायम ठेवली आहे.
शिंदेंच्या शिवसेनेचे नवे नामकरण 'एसंशिं'
या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावरही सडकून टिका केली आहे. त्यांची शिवसेना म्हणजे 'एसंशिं' असा उल्लेख त्यांनी केलाय. शिवाय त्यांचे पुर्ण नाव ही मी घेऊ इच्छीत नाही असेही ते म्हणाले आहे. त्यापुढे त्यांनी अजून काय काय म्हणाले आहे त्याची 12 मे पर्यंत प्रतिक्षा करावी लागणार आहे.