मनोज सातवी
पालघर लोकसभेत बहुजन विकास आघाडीने जोरदार तयारी चालवली आहे. पक्षाने आमदार राजेश पाटील यांना मैदानात उतरवलं आहेत. पक्षाचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूरांनी तर काही करून पालघरची जागा जिंकायची असा चंग बांधला आहे. कार्यकर्त्यंना प्रचारात उतरण्याचे आवाहन ही त्यांनी केले आहे. असे असताना अचानक हितेंद्र ठाकूर हे प्रचाराच्या मैदानापासून दुर असल्याचे दिसून आले. त्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. प्रत्यक्षात मात्र ठाकूरहे विरार इथल्या एका खाजगी रूग्णालयात दाखल आहेत. त्यांच्यावर सध्या तिथे उपचार सुरू आहेत. त्यामुळे ते सध्या प्रचारापासून दुर आहेत.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा )
ठाकूरांचे कार्यकर्ते चिंतेत
बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा आणि वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांची तब्बेत अचानक बिघडल्याने त्यांना विरारमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले आहे. आमदार ठाकूर यांना रूग्णालयात दाखल केल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी चिंता व्यक्त केली आहे.
हेही वाचा - विनायक राऊतांचा राणेंवर 'प्रहार' प्रॉपर्टीपासून भाड्यापर्यंत सर्वच काढल
ठाकूरांना का केले अॅडमिट?
हितेंद्र ठाकरू यांना, संसर्ग आणि अतिश्रमा मुळे त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हितेंद्र ठाकूर हे बोईसरचे आमदार राजेश पाटील यांचा पालघर लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ही गेले नव्हते. त्यामुळे उलट सुलट चर्चा ही सुरु होत्या. त्याचे कारण आता समोर आले आहे. त्याच बरोबर दोन दिवसापूर्वी हितेंद्र ठाकूर यांच्या पत्रकार परिषदे पूर्वी त्यांची डॉक्टरांनी तपासणी केली होती. नंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता हितेंद्र ठाकूर यांची प्रकृती स्थिर आहे.
ठाकूर प्रचारात उतरणार का?
एकीकडे पालघर लोकसभेतील प्रचार जोरदार पणे सुरू आहे. महाविकास आघाडीने आपला उमेदवार जाहीर केला आहेत. तर महायुतीला उमेदवाराची प्रतिक्षा आहे. मात्र त्यांचा प्रचार सुरू आहे. आता बहुजन विकास आघाडीनेही आपला उमेदवार जाहीर केला आहे. त्यामुळे त्याच्या प्रचारासाठी हितेंद्र ठाकूर मैदानात उतरणार की नाही हे अजूनही सस्पेन्स आहे. त्याला कारणही तसेच आहे. ठाकूर यांना डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे हितेंद्र ठाकूर काय निर्णय घेतात यावर बहुजन विकास आघाडीचे भवितव्य ठरणार आहे.
पालघरमध्ये होणार तिरंगी लढत
पालघर लोकसभेत तिरंगी लढत होत आहे. महाविकास आघाडीने पालघर मधून भारती कामडी यांनी मैदानात उतरवले आहे. तर महायुतीने अजूनही आपला उमेदवार घोषीत केलेला नाही. ही जागा मिळावी यासाठी एकनाथ शिंदेंची शिवसेना आग्रही आहे. तर भाजप ही जागा आपल्याकडे पुन्हा खेचुन आणण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे इथला उमेदवार अजूनही जाहीर झालेला नाही. तर बहुजन विकास पार्टीने आमदार राजेश पाटील यांना उमेदवारी दिली आहे.