कोकणात सध्या राणे विरूद्ध राऊत यांचे निवडणुकीच्या रिंगणात अक्षरश: धुमशान सुरू आहे. निवडणुकीत आरोपांचा शिमगा सुरू आहे. दोन्हीकडून आक्रमक प्रचार सुरू आहे. राऊत यांना विजयाची हॅट्रीक साधायची आहे. तर राणेंना पराभावाचा लागलेला डाग पुसायचा आहे. त्यामुळे दोन्ही गटाकडून प्रचाराचा आणि आरोपांचा धुरळा उडवला जात आहे. त्यात विनायक राऊत यांनी तर आता राणेंच्या प्रॉपर्टी पासून सरकारी भाडे लाटण्या पर्यंत सर्वच गोष्टी बाहेर काढत एकच खळबळ उडवून दिली आहे. राणेंच्या वरमावर बोट ठेवत मंत्री असताना काय काय केले असा प्रश्नच त्यांनी करत अनेक गोष्टी बाहेर काढल्या आहेत.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा )
19 कोटीचं सोनं अन् प्रचंड प्रॉपर्टी
नारायण राणे यांच्याकडे 19 कोटीचं सोनं आहे. प्रॉपर्टीचं तर विचारूच नका. घ्या, कमवा पण लोकांचे गळे लुटून नका कमवू, लोकांचे मुडदे पाडून नका कमवू, मी तुमच्या संपत्तीवर जळत नाही. काय खायचं तेवढे खा, पण डायबेटिस सांभाळून. शुगर वाढणार नाही याची दक्षता घ्या असा सल्ला देत विनायक राऊत यांनी राणेंवर हल्लाबोल केला. शिवाय राणेंनी राजकारणाच्या जिवावर किती कमवले तेच त्यांनी जाहीर प्रचार सभेत सांगितले. शिवाय राणे ज्या खात्याचे मंत्री होते त्याचे कार्यालय त्यांनी कणकवलीत आपल्याच वर्तमान पत्राच्या कार्यालयात थाटले. त्यातून ते दर महिना अडीच लाख भाडे स्वत; च्या खिशात टाकत होते असा आरोपही राऊत यांनी केला आहे. राणेंनी केंद्रीय मंत्री पदाचा फायदा स्वत; साठी करून घेतला असेही म्हणाले.
हेही वाचा - '...तर चपलेचा हार गळ्यात घालू' ओबसी विरूद्ध मराठा वाद पेटणार?
'राणें थापा मारतात'
नारायण राणेंनी दोन वर्षांच्या केंद्रीय मंत्री पदाच्या कारकिर्दीत त्यांच्या खात्याच्या मार्फत या जिल्ह्यामध्ये काय आणलं असा प्रश्न राऊत यांनी केला. शिवाय 22 हजार लोकांना रोजगारासाठी जर्मनीला पाठवणार असं ही सांगतलं. पण ते कधी पाठवणार? कोणाला पाठवणार? याचा पत्ता नाही. लोकांना फक्त ते थापा मारत आहेत. जर्मनीचे लोक इथं आले आणि बोलले तर ते राणेंना काही समजणार नाही आणि राणे काय बोलले हे त्यांना काही समजणार नाही असं मिश्किल पणेही ते बोलले. मंत्रिपदी असताना त्यांनी सांगितलं होतं कोट्यवधी गोरगरिबांना अर्थसाहाय्य करणार. पण सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी मधील एक तरी माणूस दाखवा की ज्याला त्यांच्या खात्यातून 75 लाख ते 03 कोटी पर्यंत अर्थसाहाय्य देण्यात आले असे आव्हान त्यांनी दिलं.
कॅलिफोर्निया सोडा केरळ तरी केलं का?
नारायण राणे हे गेली 38 वर्ष सिंधुदुर्गच्या राजकारणात आहेत. त्यांनी एकछत्री कारभार या जिल्ह्यात पाहीला. त्यावेळी त्यांनी सिंधुदुर्गचा कॅलिफोर्निया करण्याची घोषणा केली होती. कॅलिफोर्निया सोडा केरळ तरी तुम्ही करू शकले का असा खोचक सवालही त्यांनी या निमित्ताने राणे यांना केला. केरळ सोडा गोवा केलं असतं तरी चाललं असतं असा चिमटाही त्यांनी राणे यांना काढला. पण त्यातलं काही करायला राणेंना जमलं नाही. त्यामुळे राणेंचा पराभव निश्चित आहे असेही ते म्हणाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world