यंदा होऊन जाऊ दे! विखेंच्या होमग्राऊंडवर थोरातांची फटकेबाजी

थोरातांच्या संगमनेरमध्ये दहशत गुंडगिरी आहे असा आरोप राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला होता.

जाहिरात
Read Time: 3 mins
शिर्डी:

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे राजकीय वैर सर्वांनाच माहित आहे. एकमेकांना लक्ष्य करण्याची संधी हे दोन्ही नेते कधीही सोडत नाहीत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता या दोघांमध्ये वाकयुद्ध चांगलेच रंगले आहे. थोरातांच्या संगमनेरमध्ये दहशत गुंडगिरी आहे असा आरोप राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला होता. त्याला बाळासाहेब थोरांतांनी विखेंचे होमग्राऊंड असलेल्या शिर्डीत जावूनच थेट उत्तर दिले आहे. यावेळी त्यांनी विखेंना आव्हान देत जोरदार फटकेबाजी केली. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

संगमनेर विधानसभा मतदार संघात बाळासाहेब थोरातांची दहशत आहे. गुंडगिरी आहे. मतदार संघाचा विकास झालेला नाही. वाळू माफियां बरोबर थोरातांचे संबध आहेत असे आरोप राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले होते. त्याला जोरदार प्रत्युत्तर बाळासाहेब थोरातांनी दिले आहे. शिर्डीत असलेली दहशत आपल्याला मोडून काढायची आहे अशीच सुरूवात थोरातांनी केली. दहशत से आझादी हे आपलं घोषवाक्य असल्याचं ही ते म्हणाले. इथं जे राजकारण होत आहे. लोकांना इथं वेठीला धरलं जात आहे त्या पासून मुक्त करायचं आहे असं म्हणत त्यांनी विखे पाटील यांच्यावर शाब्दीक हल्ला चढवला.  

ट्रेंडिंग बातमी - भन्नाट हिंदी , सॉलिड कविता! प्रियांका गांधींची सभा घोगरे काकींनी गाजवली

 विखे पाटील यांनी संगमनेरला गुंडागर्दी आहे असं म्हटलं होतं. माझं त्यांना खुल आव्हान आहे. या आधी चार वेळा आव्हान दिलं होतं. आता पाचव्यांदा आव्हान देतो. यंदा होऊन जाऊ दे, या एका स्टेजवर आणि सांगा कुठल्या मतदार संघात काय आहे.  कोणत्या मतदार संघाचा विकास झाला आहे. कोणत्या मतदार संघातल्या संस्था कशा पद्धतीने सुरू आहेत. कोणत्या मतदार संघातलं वातावरण चांगलं आहे. एक स्टेजवर या आणि चर्चा करा असे आव्हान त्यांनी विखे पाटील यांना दिलं. 

ट्रेंडिंग बातमी - 'नरेंद्र मोदींची मेमरी लॉस' राहुल गांधींचा हल्लाबोल

शिवाय माध्यमांनीही आपले प्रतिनिधी या दोन मतदार संघात पाठवावे. त्यांनी सर्वे करावा. कोणता मतदार संघ विकासाबाबत सरस आहे हे सांगावे. मतदाना पूर्वी हा सर्वे सर्वां समोर आणा असंही थोरात यावेळी म्हणाले. विखेंची दहशत शिर्डीत आहे. ही मोडून काढायची असल्यास फक्त आणि फक्त काँग्रेसला मत द्या. ज्या लोकांना विखेंचे हे राजकारण पटत नाही त्यांनी सर्वांनी एकगठ्ठा काँग्रेसच्या पंजाला मतदान करावे असेही ते म्हणाले. या मतदार संघात बंडखोरी झाली आहे. तिकडे जर मतं गेली तर मोठी चुक होईल असंही ते यावेळी म्हणाले. 

ट्रेंडिंग बातमी - 'तुझ्या नावावर मते माग...', अजित पवारांचा पुतण्या युगेंद्र पवारांना खोचक टोला

दरम्यान त्यांनी महायुतीवरही हल्लाबोल केला. यांना लाडकी सत्ता आहे. यांना लाडक्या बहीणीचं काही पडलं नाही. भाजपचे नेते पाशा पटेल अश्लील हावभाव करत होते. तर भाजपचे खासदार महिलांबाबत आक्षेपार्ह बोलत होते. या लोकांना बहीणींचे काही पडलेले नाही असंही ते म्हणाले. ही संतांची भूमी आहे. समाज सुधारकांची भूमी आहे. संविधानामध्ये संतांचे विचार आहेत. इथल्या जनतेच्या मनात पुरोगामी आणि काँग्रेसचे विचार रूजले आहे. त्यामुळेच मविआला विजयी करा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.  

Advertisement