विधानसभा निवडणूक शेवटच्या टप्प्यात आहे. काँग्रेसने सध्या राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या प्रचाराचा धडाका लावला आहे. राहुल गांधी यांनी अमरावतीत जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केलं. मोदींची मेमरी लॉस झाली आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे जसे झाले आहे तसेच मोदींनाही होत आहे असा हल्लाबोल राहुल यांनी यावेळी केला. या सभेत त्यांनी सत्ता आल्यानंतर काँग्रेस काय करणार आहे याचा ही पाढा वाचला. शिवाय मोदी सरकारची निती कशी शेतकरी विरोधी आणि सर्व सामान्यांच्या विरोधात आहे हे ही सांगितले.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राहुल गांधी यांनी भाषणाच्या सुरूवातीलाच नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. देश हा संविधाना नुसार चालला पाहीजे. मोदी संविधानाला जिर्ण पुस्तक म्हणतात. बीजेपी आणि आरएसएसच्या लोकांसाठी संविधान म्हणजे एक जिर्ण पुस्तक असल्याचं ते म्हणाले. पण हे संविधान देशाचा डीएनए आहे असंही ते म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज, आंबेडकर, फुले यांचे विचार या संविधानात असल्याचेही ते म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - 'तुझ्या नावावर मते माग...', अजित पवारांचा पुतण्या युगेंद्र पवारांना खोचक टोला
पण भाजपचे लोक बंद खोलीत या संविधानाचा हत्या करत आहेत. त्यातूनच त्यांनी महाराष्ट्रातलं महाविकास आघाडीचं सरकार पाडलं होतं. त्यासाठी आमदारांना कोट्यवधी रूपयात विकत घेतलं गेलं. सरकारची चोरी मोदी आणि शाह यांनी केली. हे सर्व मोदी शाह यांच्या आदेशानेच झालं होतं असा आरोप राहुल गांधी यांनी केला. महाराष्ट्रातलं सरकार चोरी करा. ते पाडा हे संविधानात कुठे लिहीलं आहे का? एखादं सरकार पाडण्याची परवानगी संविधान देतं का असा प्रश्नही राहुल गांधी यांनी केला.
ट्रेंडिंग बातमी - 'धार्मिक कलह..', वोट जिहादवरुन शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांना फटकारले
मोदी प्रत्येक सभेत सांगत आहेत राहुल गांधी आरक्षणा विरोधात आहेत. पण मोदींची कदाचीत मेमरी लॉस झाली आहे असा हल्लाबोल राहुल यांनी केला. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना ही तसेच होत होते. युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांना ते रशियाचे राष्ट्राध्यक्ष बोलले होते. त्यानंतर त्यांना सांगावं लागलं की ते युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष आहेत. तशीच स्थिती मोदींची झाली आहे असं राहुल गांधी म्हणाले. आरक्षणाची पन्नास टक्केची अट काँग्रेस आणि इंडिया आघाडी काढून टाकेल असंही राहुल यांनी या सभेत सांगितलं.
सोयाबिनला सात हजार भाव देण्याचे वचन त्यांनी यासभेत शेतकऱ्यांना दिले. शिवाय कापूस आणि कांदा उत्पादकांना हमी भाव देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. महिन्याच्या एक तारखेला महिलांच्या खात्यात 3 हजार रूपये प्रत्येक महिन्याला जमा केले जातील असंही त्यांनी सांगितलं. जनगणना करण्याला आपली प्राथमिकता असेल असंही ते म्हणाले. सोयाबिनच्या शेतकऱ्याला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही असे वचन राहुल गांधी यांनी या सभेत दिले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world