कोट्यवधींचे दागिने, शेतजमीन, FD, शेअर्स... सुप्रिया सुळेंची एकूण संपत्ती किती?

सुप्रिया सुळे यांच्याकडे चल-्अचल अशी एकूण जवळपास 48 कोटींची संपत्ती आहे. 

Advertisement
Read Time: 2 mins
पुणे:

महाविकास आघाडीच्या बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुप्रिया सुळे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. अर्ज दाखल करताना त्यांनी प्रतिज्ञापत्र देखील सादर केलं. या प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपल्या संपत्तीची सविस्तर माहिती दिली आहे. सुप्रिया सुळे यांच्याकडे चल-्अचल अशी एकूण जवळपास 48 कोटींची संपत्ती आहे. 

सुप्रिया सुळे यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे जवळपास 38 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे. तर जवळपास 9 कोटींची स्थावर मालमत्ता आहे. सुप्रिया सुळे यांच्या नावे एकही गाडी नसल्याची माहिती प्रतिज्ञापत्रातून समोर आली आहे. 

मतदानाची ओळख असलेली निळी शाई कुठून येते? लगेच का पुसली जात नाही?

कोट्यवधींचे सोने, चांदी, हिरे

सुप्रिया यांच्याकडे अडीच कोटींहून अधिक किमतीचे सोने, चांदी, हिरे आहे. बँकेत देखील सुप्रिया यांच्या कोट्यवधींच्या ठेवी आहेत. तर शेअर्समध्ये देखील त्यांची जवळपास साडेतीन कोटींची गुंतवणूक आहे. 

पार्थ आणि सुनेत्रा पवारांचं कर्ज

सुप्रिया सुळे यांनी पार्थ पवार आणि सुनेत्रा यांच्याकडून कर्ज घेतलं आहे. पार्थ पवार यांच्याकडून 20 लाख रुपये तर सुनेत्रा पवार यांच्याकडून 35 लाखांचं कर्ज घेतल्याची माहिती प्रतिज्ञापत्रात आहे. 

Advertisement

अजित पवारांनी केलं थेट शरद पवारांना लक्ष्य, कामाचा हिशेबच मांडला, वाद पेटणार?

सुप्रिया सुळे यांची एकूण संपत्ती

बँकेतील ठेवी - 11 कोटी 83 लाख
शेअर्स - 16 कोटी 44 लाख
दिलेले कर्ज त्यातून मिळणारे उत्पन्न - 3 कोटी 50 लाख
सोने - 1 किलो 927 ग्रॅम (जवळपास 1 कोटी)
चांदी- 6 किलो 742 ग्रॅम (4 लाख 53 हजार)
हिरे- 793 कॅरेट (1 कोटी 56 लाख)
शेत जमीन - 5 कोटी 45 लाख
बिगर शेत जमीन - 1 कोटी 74 लाख
निवासी प्लॅट - 1  कोटी 95 लाख
पार्थ पवार कर्ज - 20 लाख
सुनेत्रा पवार कर्ज - 35