जाहिरात
Story ProgressBack

मतदानाची ओळख असलेली निळी शाई कुठून येते? लगेच का पुसली जात नाही?

Lok Sabha Elections 2024 : मतदानानंतर बोटावर निळी शाई लावली जाते. ही निळी शाई मतदान करण्याची खूण आहे.

Read Time: 3 min
मतदानाची ओळख असलेली निळी शाई कुठून येते? लगेच का पुसली जात नाही?
निळी शाई मतदान करण्याची खूण मानली जाते. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाच्या उत्सवात तुम्ही भाग घेतलाय याचा हा पुरावा आहे.
मुंबई:

लोकशाहीचा उत्सव म्हणजेच लोकसभा निवडणुकीला  (Lok Sabha Elections 2024) 19 एप्रिलपासून सुरुवात होतीय. शुक्रवारी पहिल्या टप्प्यात 102 जागांवर मतदान होईल. मतदानानंतर बोटावर निळी शाई लावली जाते.  ही निळी शाई मतदान करण्याची खूण मानली जाते. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाच्या उत्सवात तुम्ही भाग घेतलाय याचा हा पुरावा आहे. भारतीय निवडणुकींमध्ये या शाईचा वापर करण्याचे श्रेय पहिले मुख्य निवडणूक आयुक्त सुकुमार सेन यांना जाते.

या निळ्या शाईची परंपरा काय आहे? ही शाई कुठं बनते? ही शाई पुसली जाते का? या सर्व विषयाची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. 

काय आहे इलेक्शन इंक?

पाण्यावर आधारित या शाईमध्ये सिल्हर नायट्रेट, वेगवेगळ्या प्रकारचे डाय (रंग) आणि काही सॉल्वेंट्सस यांचे कॉम्बिनेशन असते. याला इलेक्शन इंक म्हणूनही ओळखलं जातं. बोटाचं नख आणि त्वचेवर ही शाई लावण्यासाठी जेमतेम 40 सेकंद लागतात. या कमी कालावधीतही याचा ठसा उमटतो. 

Voter ID डाऊनलोड कसा करणार? वाचा सोपी पद्धत, काही मिनिटांमध्येच होईल काम
 

कोण आहे संरक्षक?

नवी दिल्लीतील नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी (NPL) मधील केमिस्ट (रसायनतज्ज्ञ) डॉ. नाहर सिंह सध्या या फॉर्म्युल्याच्या संरक्षक आहेत. डॉ. सिंह यांनी याबाबत सांगितलं की, 'हे एक रहस्य आहे. 'इलेक्शन इंक' बाबत गुप्तता कायम राहावी म्हणून त्यावर कधीही कोणतं पेटंट घेतलेलं नाही. 1962 नंतर हे रहस्य कधीही उघड झालेलं नाही. 

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या शाईवर संशोधन करण्यात आलं आहे. NPL कडं याचा कोणताही लेखी रेकॉर्ड नाही. औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) मधील रसायनतज्ज्ञ सलीमुज्जमां सिद्दीकी यांनी ही शाई बनवली होती.  पण ते पाकिस्तानमध्ये निघून गेले. भारातामध्ये या कामाला सिद्दीकी यांचे सहकारी विशेषत: डॉ.एमएल गोयल, डॉ. बीजी माथूर आणि डॉ. व्ही.डी. पुरी यांनी पुढं नेलं. 

Voter ID नसेल तरी टेन्शन नाही, तुम्हाला करता येईल मतदान!
 

कधी झाला पहिल्यांदा वापर?

1962 साली झालेल्या तिसऱ्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत या शाईचा पहिल्यांदा वापर करण्यात आला. बोगस मतदारांना आळा घालणे हा याचा उद्देश होता. 'ही निळ्या रंगाची शाई पाणी, डिजर्जंट, साबन आणि सॉल्व्हेंट्सला प्रतिरोध करणारी बनवण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही कशानंही हात धुतले तरी ती मिटत नाही. नखांवर काही आठवडे याची खूण राहते. नख मोठं झाल्यानंतर ती हळू-हळू मिटते. या शाईमुळे काहीही अपाय होत नाही,' अशी माहिती डॉ. सिंह यांनी दिली. 

कुठे बनते शाई?

ही शाई दक्षिण भारतामधील एका कंपनीत बनते. म्हैसूरच्या पेंट अँड वॉर्निश लिमिटेड (MVPL) कंपनीत या शाहीची निर्मिती होते. NPL कडं 1962 पासून या शाईचं लायसन्स आहे. तर सर्व माहिती MVPL कडं हस्तांतरित करण्यात आली आहे. या शाईची बाजारात विक्री केली जात नाही. फक्त सरकार आणि निवडणुकीशी संबंधित यंत्रणांना याचा पुरवठा केला जातो.  

यंदा किती होणार वापर?

2024 साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी MVPL कंपनीनं जवळपास 28 लाख निळ्या शाईच्या बॉटल्सचा पुरवठा निवडणूक आयोगाला केला आहे. त्याची किंमत 58 कोटी आहे. 2019 साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत जवळपास 26000 लीटर शाईचा पूरवठा करण्यात आला होता. 

MVPL चे मुख्य मुख्य कार्यकारी अधिकारी मोहम्मद इरफान यांनी सांगितलं की, 'आम्ही जवळपास 1 अब्ज मतदारांना शाई लावणार आहोत. MVPL कडून विकसित करण्यात आलेली ही शाई देशातील निवडणूक प्रक्रिया अखंड राखणे तसंच मतदानाच्या दरम्यान फसवणुकीचे प्रकार रोखण्यासाठी उपयोगी आहे. निवडणूका निष्पक्ष आणि पारदर्शी होण्याचं हे एक माध्यम आहे.'

'या' देशांना होते निर्यात

MVPL नं आत्तापर्यंत मलेशिया, कॅनडा, कंबोडिया, घाना, आयव्हरी कोस्ट, अफगाणिस्तान, तुर्की, नायजेरिया, पापूआ न्यू गिनी, नेपाळ, मेडागास्कर, नायजेरिया, सिंगापूर, दुबई, लियोन, दक्षिण आफ्रिका, डेन्मार्क, मंगोलीयासह जवळपास 35 देशांना निळी शाई निर्यात केली आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination