जाहिरात

Beed News: धनंजय मुंडेंना जाणवतेय 'या' आरोपी मित्राची उणीव, जाहीर सभेत नाव न घेता काढली आठवण

याच काळात आता परळी नगरपरिषदेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत महायुती झाली आहे.

Beed News: धनंजय मुंडेंना जाणवतेय 'या' आरोपी मित्राची उणीव, जाहीर सभेत नाव न घेता काढली आठवण
बीड:

आकाश सावंत 

नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराची सध्या रणधुमाळी सुरू आहे. बीड जिल्ह्यात ही नगरपालिकांच्या निवडणूका होत आहेत. पण सर्वांचे लक्ष लागले आहे ते परळी नगरपरिषदेच्या निवडणुकीकडे. महायुती म्हणून राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप ही निवडणूक एकत्र लढत आहेत. निवडणुकीची जबाबदारी ही राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर आहे. मुंडे भाऊ बहीणींचा परळी हा गड मानला जातो. त्यांच्या या गडात राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं त्यांच्या समोर आव्हान निर्माण केले आहे. त्यामुळे स्वत: धनंजय मुंडे हे प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. त्यांनी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ केला. पण यावेळी त्यांना आठवण झाली ती त्यांचा जेलमध्ये असलेला परमित्र वाल्मीक कराड याची. त्यामुळे सर्वांच्याच भूवया उंचावल्या. 

परळी नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ आज सोमवारी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये संयुक्त मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी आमदार धनंजय मुंडे भाषणाच्या शेवटी आपल्या परममित्राची आठवण काढली. त्यामुळे सर्वांचेच कान टवकारले होते. ते म्हणाले आज परळीतील जगमित्र कार्यालय सुरू आहे. ते आजही सर्वसामान्य जनतेसाठी खुलं आहे. मात्र आज या मंचावर मला एक व्यक्तीची उणीव भासत आहे. ती व्यक्ती आज आपल्यात नाही. जे काहीअसेल नसेल ते न्यायालय पाहील. काय व्हायचे ते होईल. मात्र त्या व्यक्तीची आज उणीव भासत आहे असं धनंजय मुंडे यांनी नाव न घेता आरोपी वाल्मिक कराडची आठवण काढली. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या वेळी धनंजय मुंडे यांना वाल्मीक कराडची आठवण का झाली याची ही चर्चा रंगली आहे. 

नक्की वाचा - Ujjwal Nikam: '...म्हणून मी संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या सुनावणीला जात नाही', उज्ज्वल निकम असं का बोलले

वाल्मीक कराड आणि परळी नगरपरिषद हे एक समीकरण झालं होतं. परळी नगपरिषदेत याच वाल्मीकचा दबदबा होता. त्याने या नगरपरिषदेचे नगराध्यक्षपदही भूषवले आहे. शिवाय तो परिषदेत पक्षाचा गटनेताही राहीला आहे. परळीची निवडणूक ही तोच सांभाळायता. त्याच्या अनुपस्थित होणारी परळी नगरपरिषदेची ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळेच की काय धनंजय मुंडे यांना त्याची कमी भासली आहे. ती त्यांनी जाहीर पणे बोलून ही दाखवली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांनी वाल्मीक कराडचे नाव घेणे टाळले होते. पण यावेळी त्यांनी त्याचे नाव जरी घेतले नसले तरी त्याची आठवण मात्र नाव न घेता काढली आहे. 

नक्की वाचा - Shocking: धक्कादायक! भारतीय तरुणीचा चीनमध्ये 18 तास छळ, शांघाय एअरपोर्ट बनवले 'कैदखाना', प्रकरण काय?

वाल्मीक कराड सध्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात जेलची हवा खात आहे. त्याच्या विरोधात एसआयटीकडे ठोस पुरवे असल्याचं ही बोललं जात आहे. दरम्यान याच काळात आता परळी नगरपरिषदेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत महायुती झाली आहे. त्यानुसार महायुतीचे 23 उमेदवार रिंगणात आहेत. तर नगराध्यक्षपदासाठी पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी महायुतीकडून निवडणूक लढत आहेत. त्याच्या विरोधात राष्ट्रवादी  शरद पवार पक्षाच्या संध्या दीपक देशमुख मैदानात आहेत. तर काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. इथं महाविकास आघाडी झालेली नाही. ही निवडणूक पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यासाठी प्रतिष्ठेची झाली आहे.   

Listen to the latest songs, only on JioSaavn.com