विधानसभा निवडणुकीत अनेत मतदार संघात सख्ख्या रक्ताचे एकमेकां विरोधात उभे होते. कुठे भावा विरोधात भाव, नवऱ्या विरोधात बायको. कुठे काका विरोधात पुतण्या अशा लढती झाल्या. पण एक लढत लेक विरूद्ध बाप अशी ही झाली. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा मतदार संघात ही लढत रंगली होती. त्यात बापानं बाप हा बाप असतो हेच दाखवून दिले. इथं लेकीचा बापानं मोठा पराभव केला. पराभव केल्यानंतर विरोधात उभ्या राहिलेल्या लेकीला बापाने खोचक सल्ला देत आता निवडणूक संपली आहे. तुझं इथं काही काम नाही. तू सासरी निघून जा असं सांगितलं आहे. याचीच सर्चा सध्या मतदार संघात रंगली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अहेरी विधानसभा मतदार संघ या निवडणुकीत चांगलाच चर्चेत राहीला. या मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे धर्मारावबाबा आत्राम निवडणूक रिंगणात होते. तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने त्यांची कन्या भाग्यश्री हलगेकर यांनी निवडणूक रिंगणात उतरवलं होतं. इथं बाप लेकीमध्ये लढत रंगली होती. शिवाय पुतण्या अम्ब्रीशराव आत्राम ही मैदानात होते. त्यामुळे इथे तिरंगी लढत रंगली होती.
ट्रेंडिंग बातमी - एक'नाथ' है तो सेफ है, सेना नेत्याच्या ट्वीटनं ट्विस्ट
मतमोजणीनंतर धर्मारावबाबा आत्राम यांनी निवडणुकीत बाजी मारली. त्यांनी मुलगी भाग्यश्री यांचा 18 हजार पेक्षा जास्त मतांनी पराभव केला. भाग्यश्री या तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेल्या. धर्मारावबाबा आत्राम यांचे पुतणे दुसऱ्या क्रमांकावर राहीले. त्यामुळे लेक भाग्यश्री यांचे आमदार होण्याचे स्वप्न या निवडणुकीत तरी धुळीस मिसळले. बापाने लेकीला बरोबर पुतण्यालाही आस्मान दाखवले. एकाच कुटुंबातील तिघांमध्ये ही निवडणूक रंगली होती.
निवडणूक जिंकल्यानंतर धर्माराव बाबा आत्राम यांनी मुली आता खोचक सल्ला दिला आहे. आता निवडणूक संपली आहे. मुलीचं आता इथे काही काम नाही. त्यमुळे जावई आणि लेकीने सासरी निघून जावे. असा वडीलकीचा सल्ला त्यांनी मुलीला दिला आहे. या विधानसभा निवडणुकीत मला माझी लहान मुलगी आणि मुलाने पाठिंबा दिला होता.त्यांनी मेहनत घेतली. शिवाय महायुतीमधील घटक पक्षांनीही मदत केली. त्यामुळे आपण विजयी होवू शकलो असंही ते यावेळी म्हणाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world