BMC Election 2026 : मुंबईचा 'बॉस' कोण होणार? BMC वरील सत्तेसाठी सर्वकाही पणाला; महाबजेटवर एक नजर

BMC Election 2026: राज्यातील महानगरपालिका निवडणुकीत आज २९ महानगरपालिकांसाठी मतदान होत आहे. यामध्ये सर्वांचं लक्ष मुंबई महानगरपालिका निवडणुकीवर आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Mumbai Municipal Corporation Election 2026 : राज्यातील महानगरपालिका निवडणुकीत आज २९ महानगरपालिकांसाठी मतदान होत आहे. यामध्ये सर्वांचं लक्ष मुंबई महानगरपालिका निवडणुकीवर आहे. यामध्ये ठाकरे बंधू आपल्या शेवटचा गड वाचविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. तर दुसरीकडे भाजप पहिल्यांदा शिवसेना एकनाथ शिंदे गटासह पहिल्यांदा मैदानात उतरली आहे. राज ठाकरे यांची मनसे आणि उद्धव ठाकरे गटाने मराठी अस्मितेचा मुद्द्यावर निवडणूक लढवित आहेत. मुंबई महानगरपालिकेचे बजेट ७५ हजार कोटी रुपयांहून अधिक आहे. येथे १२५ कोटींची संपत्ती असलेला उमेदवारही निवडणुकीच्या रिंगणात आहे. 

बीएमसीचे बजेट ७५ हजार कोटी...

साधारण २०० वर्षे जुनी मुंबई महानगरपालिका म्हणजेच बीएमसीचा बजेट ७५ हजार कोटींहून अधिक आहे. जो अनेक ईशान्येकडील राज्यांच्या बजेटपेक्षा अधिक आहे. बीएमसी तलाव, मेडिकल कॉलेजसारखी मोठी संपत्ती आहे. बीएमसीने ८० हजार कोटींची एफडी केली आहे. मुंबई महानगरपालिकेत २२७ वॉर्ड आहेत आणि बहुमतातून आपला महापौर उभा करण्यासाठी ११४ जागांची आवश्यकता असते. 

बीएमसीकडे उभा केला मोठा निधी

बीएमसीकडे असलेल्या तिजोरीमुळे राज्यातील पूल, रस्ते, उन्नत रस्ते किंवा कोणत्याही गृहनिर्माण प्रकल्पासाठी निधी उभारणे सोपे होते. बीएमसीच्या प्रत्येक वॉर्डचा विकास बजेट कोट्यवधींमध्ये आहे. किनारी विकास, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, उद्याने आणि रुग्णालये यासारख्या मोठ्या प्रकल्पांसाठी निधी सहज उपलब्ध आहे.

बीएमसीला निधी कसा उभारते?

बीएमसीचा महसूल खात्यातील मोठा भाग रियल इस्टेट प्रकल्पांच्या बांधकाम व्यावसायिकांकडून वसूल केलेल्या प्रीमियममधून येतो. बीएमसी फ्लॅट्स, इमारती आणि शॉपिंग मॉल्स तसेच बाजारपेठांवर मालमत्ता कर आणि जीएसटीमधून अब्जावधी रुपये देखील गोळा करते.

Advertisement

ठाकरे बंधूंसमोर मोठे आव्हान...

शिवसेना फुटीनंतर ही पहिलीच निवडणूक आहे. यापूर्वी २०१७  मध्ये शेवटची निवडणूक झाली होती आणि २०२२ मध्ये बीएमसीमध्ये निवडणूक न झाल्याने प्रशासकाकडून जबाबदारी सांभाळत आहे. 

नक्की वाचा - Nagpur News : भाजप उमेदवारावर जीवघेणा हल्ला; रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात पोहोचले!

BMC मध्ये युती आणि जागा 

भाजप - 137
शिवसेना शिंदे गट-90

एनसीपी-94

शिवसेना उद्धव ठाकरे गट-163
एमएनएस (शरद पवार गट)-52

काँग्रेस 143
वंचित-46

Advertisement

कोणत्या महानगरपालिकेचं किती बजेट...

मुंबई- 75 हजार कोटी
पुणे-9.5 हजार कोटी
नवी मुंबई-5700 कोटी 
नागपुर-5400 कोटी
मीरा भाईंदर - 2700 कोटी
ठाणे- 5600 कोटी
कल्याण-डोंबिवली-3300 कोटी
भिवंडी-1100 कोटी
पनवेल-4000 कोटी
पिंपरी-चिंचवड़-9600 कोटी
उल्हासनगर-1000 कोटी