जाहिरात

दादरमध्ये चक्र फिरलं! सदा सरवणकरांचे पुत्र समाधान सरवणकरांचा दारुण पराभव; ठाकरे गटाचे निशिकांत शिंदे विजयी

Samadhav Sarvankar Vs Nishikant Shinde: मुंबई महानगरपालिकेत दादरमध्ये शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे.

दादरमध्ये चक्र फिरलं! सदा सरवणकरांचे पुत्र समाधान सरवणकरांचा दारुण पराभव; ठाकरे गटाचे निशिकांत शिंदे विजयी
मुंबई:

BMC Election 2026 Result :  मुंबई महानगरपालिकेत दादरमधील १९४ प्रभागातून शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. दादरमधील प्रतिष्ठीत लढतीत शिवसेना शिंदे गटाचे सदा सरवणकर यांना मोठा धक्का बसला आहे. समाधान सरवणकर हे सदा सरवणकरांचे पूत्र. त्यांनी १९४ प्रभागातून निवडणूक लढवली होती. यात समाधान सरवणकर पराभूत झाले आहेत. त्यांच्याविरोधात ठाकरे गटाचे निशिंकात शिंदे विजयी झाले आहे. दादरमध्ये हाय व्होल्टेज प्रभागांत शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. यापूर्वी विधानसभा निवडणुकीत सदा सरवणकर यांना माहीममधून शिंदे गटाने उमेदवारी दिली होती. त्यामध्ये त्यांनाही पराभवाचा सामना करावा लागला होता.

आतापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार, मुंबई महानगरपालिकेत भाजपने २२७ जागांपैकी ६६ जागांवर आघाडी घेतली आहे. याशिवाय शिवसेना उद्धव ठाकरे गट ५४ जागांच्या आघाडीवर आहे. शिंदे सेना २० जागांवर तर काँग्रेस ५, मनसे ५ जागांवर आघाडी आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत मुंबई महानगरपालिकेत ठाकरे गटाने भाजपला काँटे की टक्कर दिली आहे. 

Election 2026 : ठाकरे गट अन् भाजपमध्ये 'काँटे की टक्कर'; मुंबईचा 'बॉस' कोण? पुण्यात कोणाची सरशी; पाहा लेटेस्ट कल 

नक्की वाचा - Election 2026 : ठाकरे गट अन् भाजपमध्ये 'काँटे की टक्कर'; मुंबईचा 'बॉस' कोण? पुण्यात कोणाची सरशी; पाहा लेटेस्ट कल 

समाधान सरवणकर यांच्या पराभवानंतर ठाकरे गटाचे आमदार महेश सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'मी शपथ घेतली होती की सरवणकर नाव प्रभादेवीमधून पुसून टाकेन. ज्यांनी बाळासाहेबांना आणि उद्धव ठाकरेंना त्रास दिला, त्यांना जनतेने धडा शिकवला. मी 2017च्या महापालिका निवडणुकीत नारळ घेऊन उभा होतो, त्यावेळेस मी हरलो. तेव्हा त्यांनी माझ्या घरासमोर नारळ फोडले होते, आज मी त्यांच्या हातात नारळ देणार.'

Listen to the latest songs, only on JioSaavn.com