राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून अजित पवारांच्या एग्झिटपर्यंत, छत्रपती संभाजीराजे भरसभेत काय म्हणाले?

गेल्या 75 वर्षात आता एवढं गलिच्छ राजकारण महाराष्ट्राने कधीच बघितलं नाही, असं म्हणत छत्रपती संभाजी राजेंनी सर्वच पक्षातील बड्या नेत्यांवर टीका केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
बीड:

स्वानंद पाटील, प्रतिनिधी 

गेल्या 75 वर्षात आता एवढं गलिच्छ राजकारण महाराष्ट्राने कधीच बघितलं नाही, असं म्हणत छत्रपती संभाजी राजेंनी सर्वच पक्षातील बड्या नेत्यांवर टीका केली आहे. शरद पवारांनी काँग्रेसमधून राष्ट्रवादीची स्थापना केली. इथून सुरुवात करत राजेंनी अजित पवार हे भाजपसोबत कसे गेले यासह राज्यातील राजकारणाचा संभ्रमित करणारा घटनाक्रम यावेळी मांडला. सुसंस्कृत राजकारणासाठी स्वराज्य पक्षच काम करू शकतो, असे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले. गेवराई येथील आयोजित सभेत छत्रपती संभाजी राजे बोलत होते.

नक्की वाचा - दिवसभर सलाईन, रात्री पुन्हा प्रचार सभा; इम्तियाज जलील यांचा 'तो' फोटो व्हायरल

छत्रपती संभाजीराजे हे गेवराई विधानसभा मतदारसंघातील स्वराज्य पक्षाच्या उमेदवार पूजा मोरे यांच्या प्रचारासाठी आले होते. यावेळी त्यांनी इतर पक्षातील बड्या नेत्यांवर टीका केली. या प्रचारसभेत संभाजीराजे यांनी उद्धव ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरेंचं काँग्रेसबद्दल असलेल्या मतांची आठवण करून दिली. बाळासाहेब म्हणाले होते की, कधीही काँग्रेस सोबत जायचं नाही. मात्र उद्धव ठाकरे खुर्चीसाठी काँग्रेस सोबत गेले. बाळासाहेबांच्या सूचना उद्धव ठाकरे विसरले. देवेंद्र फडणवीस हे अजित पवार यांना चिक्की पीसिंग असे म्हणाले होते. एवढेच नाही तर आधी पंतप्रधान म्हणाले की, अजित पवारांनी 74 कोटींचा घोटाळा केला. यानंतर काही दिवसात अजित पवार महायुतीत गेले. यावर ही वैचारिक युती नाही तर विकासासाठी महायुतीत गेलो असे ते  म्हणाले. 

Advertisement

शिवसेनेवाला सकाळी 10 वाजता मीडियासमोर बोलायला सुरू करतो. सर्वसामान्यांच्या प्रश्नावर कुणीही बोलत नाही. पुढे बीडमधील घराणेशाहींवर त्यांनी टीकास्त्र डागले. गेवराईवर पंडितांचा अधिकार नाही. बीडमध्ये क्षीरसागर घरातच राजकारण करतात. आधी काका फॉर्म भरतो, नंतर माघार घेतो. पुतण्याला पाठिंबा देतो. आपण फक्त आयुष्यभर चळवळी करत राहायच्या का? तुम्ही सर्वांनी एकत्र येणे ताकद देणे गरजेचे आहे. आमची स्टार प्रचारक आमची जनता आहे. ज्याच्याकडे सत्ता कारखाने अशानीच विधानसभेवर जायचं का? पूजा मोरे सांरख्यांनी का नाही? 

Advertisement

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

चारही उमेदवारांना समोर बसवा आणि कोण गेवराईचा कसा विकास करणार याची ओपन डिबेट बोलवा. पूजा मोरे म्हणजे तारा राणीच. स्वराज्याची उमेदवार म्हणून तिला निवडलं. विरोधकांच्या कार्यकर्त्यांनी जर दहशतीचा प्रयत्न केला तर त्याच्या पाठीशी छत्रपती संभाजी राजे असणार आहेत हे विसरू नका. माझ्या हातातली तलवार शोसाठी नाही. मराठा आरक्षणासाठी पूजा मोरेंनी लढा दिला. मनोज जरांगे पाटील यांना ताकद देण्याचे काम संभाजीराजांनी केलं. पुढेही करणार आहे. संसद भवनात मराठ्यांनी पहिलं आंदोलन केल, म्हणून जरांगेचाच लढ्याला स्वराज्य पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे. जरांगे आपल्याबरोबरच आहेत, त्यांचं माझं नेहमी बोलणं होतं.

Advertisement