जाहिरात

दिवसभर सलाईन, रात्री पुन्हा प्रचार सभा; इम्तियाज जलील यांचा 'तो' फोटो व्हायरल

दिवसभर एका खाजगी रुग्णालयात उपचार घेणारे इम्तियाज जलील (Imtiaz Jalil Pracharsabha) संध्याकाळी पुन्हा सभेसाठी हजर झाले.

दिवसभर सलाईन, रात्री पुन्हा प्रचार सभा; इम्तियाज जलील यांचा 'तो' फोटो व्हायरल
छत्रपती संभाजीनगर:

मोसिन शेख, प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीत (Chhatrapati Sambhajinagar Assembly Election) प्रत्येक उमेदवार ताकदीने प्रचारात उतरला आहे. त्यामुळे प्रचार रॅली, कॉर्नर मिटिंग, जाहीर सभांचा धडाका पाहायला मिळतोय. उन्हातान्हात न थांबता प्रचार सुरू असतो. खाण्यापिण्याचीही उसंत मिळत नाही. अशात दिवस-रात्र कामात व्यस्त असलेल्या अनेकांना आरोग्याच्याही समस्यांना सामोरं जावं लागतं. औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातील एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील आजारी पडले आहेत. सकाळच्या सत्रातील त्यांची रॅली रद्द करण्यात आली होती. पण दिवसभर एका खाजगी रुग्णालयात उपचार घेणारे इम्तियाज जलील (Imtiaz Jalil Pracharsabha) संध्याकाळी पुन्हा सभेसाठी हजर झाले. हाताला सलाईनची सुई लावलेली असताना, जलील यांनी आपलं भाषण केले. त्यांच्या या भाषणाचे फोटो देखील व्हायरल होत आहे. 

'गद्दार गद्दार'च्या घोषणा, मुख्यमंत्र्यांनी ताफा थांबवला अन् थेट गाठलं काँग्रेस कार्यालय; पुढे काय घडलं? 

नक्की वाचा - 'गद्दार गद्दार'च्या घोषणा, मुख्यमंत्र्यांनी ताफा थांबवला अन् थेट गाठलं काँग्रेस कार्यालय; पुढे काय घडलं? 

औरंगाबाद पूर्व विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार अतुल सावे विरुद्ध एमआयएमचे इम्तियाज जलील यांच्यात सामना होत आहे. मात्र या मतदारसंघात 15 मुस्लीन उमेदवार लढत असल्याने मुस्लीम मतांचं विभाजन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इम्तियाज जलील यांच्यासाठी निवडणूक जिंकण्याचं आव्हान असणार आहे. यासाठी जलील यांनी देखील कंबर कसली आहे. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत प्रचार रॅली, कॉर्नर मीटिंग, जाहीर सभा आणि महत्त्वाच्या लोकांच्या भेटीगाठी असं त्यांचं दिवसभराचं शेड्युल आहे. गेल्या आठवड्याभरापासून सलग प्रचारसभा सुरू आहेत. प्रचारात व्यस्त असलेले जलील आजारी पडले होते. त्यामुळे १२ नोव्हेंबरची सकाळची नियोजित रॅली देखील रद्द करण्यात आली. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. डॉक्टरांनी जलील यांना सलाईन लावली. मात्र दिवसभर उपचार घेऊन जलील पुन्हा संध्याकाळी सभेसाठी पोहोचले. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

चेहऱ्यावर तणाव...
शहरातील संजय नगर भागात इम्तियाज जलील यांची सभा झाली. मात्र, या सभेत भाषण करताना जलील यांच्या चेहऱ्यावरील तणाव लक्ष वेधून घेत होते. त्यांच्या आवाजात देखील खोलपणा जाणवत होता. भाषण करताना उभे राहणे देखील त्यांच्यासाठी कठीण होतं, त्यामुळे अनेकदा ते कमरेला हात लावताना दिसून आले. हाताला सलाईनची सुई पाहायला मिळत होती. जलील यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे, त्यामुळे आजारी असताना देखील ते प्रचारात स्वतःला झोकून देताना दिसत आहे. .

Listen to the latest songs, only on JioSaavn.com