विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत काही उमेदवार असे आहेत जे आपल्या नेत्या समोर त्यांच्या पेक्षा जास्त भाव खाऊन जातात. नेत्या समोरच सभा गाजवतात. तसचं काहीसं घडलं शिर्डी विधानसभा मतदार संघामध्ये. या मतदार संघात काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची सभा आयोजित करण्यात आली होती. या मतदार संघात काँग्रेसने प्रभावती घोगरे यांना उमेदवारी दिली आहे. प्रियांका यांच्या समोर भाषण करण्याची संधी घोगरे यांना मिळाली. मग काय नेत्या समोर त्यांनी हिंदीतून भाषण ठोकले. येवढचं नाहीत तरा चारोळ्याही केल्या. त्यामुळे प्रियांका गांधींनाही हसू आवरलं नाही. तर उपस्थितांनीही घोगरे यांच्या भाषणाला जोरदार प्रतिसाद दिला.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
प्रभावती घोगरे यांना काँग्रेसने शिर्डी विधानसभा मतदार संघातून उमेदवारी दिली आहे. त्यांना मतदार संघात घोगरे काकी म्हणून ओळखले जाते. त्यांच्या प्रचारासाठी प्रियांका गांधी शिर्डीत आल्या होत्या. उमेदवार असल्याने घोगरे काही या स्टेजवर होत्या. शिवाय त्यांना प्रियांका गांधी यांच्या समोर बोलण्याची संधी ही देण्यात आली. भाषणाची सुरूवात त्यांनी मराठीतून केली. तुम्ही प्रियांका गांधींना ऐकण्यासाठी आला आहात. वेळ थोडा आहे. त्यामुळे माझा गोंधळ झाला आहे. पटापट बोलवं लागत आहे. असं सांगत त्यांनी प्रियांका गांधी यांच्यासाठी थेट हिंदीतून भाषणला सुरूवात केली.
ट्रेंडिंग बातमी - 'नरेंद्र मोदींची मेमरी लॉस' राहुल गांधींचा हल्लाबोल
त्या म्हणाल्या 'मै सिर्फ इतना कहना चाहती हूँ, की एक किसान के बेटी को मिलने आप आयी है. मी कधी विचार केला नव्हात की तुमच्याशी कधी भेट होईल. देशाच्या मोठ्या नेत्यांबरोबर बसण्याची संधी मिळेल. त्यानंतर त्या म्हणाल्या की शेतकऱ्यांनी एकदा ठरवलं तर काही होवू शकतं. त्यानंतर त्यांनी प्रियांका गांधी यांच्यासाठी चारोळीही केली. त्या म्हणाल्या, ' मै कहूं गी तुफान के साथ आँधी है, ये दुसरी इंदिरा गांधी है, त्यानंतर उपस्थितांनी तयांना प्रचंड प्रतिसाद दिला. त्यानंतर 'प्रियांका जी आप मै दिखती है इंदिराजी की झांकी, अभी बीजेपी हराना है बाकी. त्यांच्या या अफलातून चारोळीवर प्रियांका गांधीनीही दाद दिली. त्यांनाही हसू आवरले नाही.
ट्रेंडिंग बातमी - 'तुझ्या नावावर मते माग...', अजित पवारांचा पुतण्या युगेंद्र पवारांना खोचक टोला
आपल्या छोट्याश्या भाषणात त्यांनी मतदार संघातल्या मुद्द्यांनाही हात घातला. शिर्डीमध्ये गेल्या 30 वर्षापासून दहशतवाद आहे. तो संपवण्यासाठी मी उभी आहे असं ही त्या म्हणाल्या. हे सर्व त्या हिंदीतून बोलत होत्या. मग त्या स्वत:हून म्हणाल्या आता मी मराठीत बोलते. त्यानंतरही उपस्थितांनी त्यांना दाद दिली. दुध, सोयाबीनला भाव नाही तो भाव मिळवून द्यायचा आहे. निलवंड्याचे पाणी, गोदावरी कालव्याचा प्रश्न, नगर मनमाडचा प्रश्न या मतदार संघात आहेत. 30 वर्ष इथं जे आमदार आहेत त्यांनी काहीच केलं नाही. त्यांनी केवळ आश्वसनं दिली. सध्या पार्ट्या आणि मद्य पार्ट्या सुरू आहेत. त्यामुळे या निवडणुकीत माझ्या मागे खंबिर पणे उभे रहा आणि विजयी करा असं आवाहन त्यांनी केलं.