घुसखोरांची आरती करणाऱ्या काँग्रेसला देशात कुठंही संधी देऊ नका, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्य़ा उमेदवारांच्या प्रचारासाठी नवी मुंबईत झालेल्या सभेत ते बोलत होते. काँग्रेस पक्षाकडून प्रत्येक पिढीत गरीबी हटाओ ही खोटी घोषणा दिली जाते. पण, गरीबी हटाओ घोषणा देत काँग्रेसनं गरिबांनाच लुटलं, असा आरोप पंतप्रधानांनी या भाषणात केला.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले पंतप्रधान ?
झारखंडमधील काँग्रेस नेत्यानं सत्ता मिळाली तर स्वस्त गॅस सिलेंडर घुसखोरांना देणार अशी घोषणा केली आहे. घुसखोरांची आरती करणाऱ्यांना देशात कुठंही संधी मिळावी का? असा प्रश्न त्यांनी विचारला. त्यांचा एक नेता खुलेआम सांगतोय, घुसखोर, रोहिंग्या आणि बांगलादेशींना स्वस्त सिलेंडर देत आहे. हे मत मिळवण्यासाठी तुमच्या मुलाच्या भविष्यासाठी काय करतील याचं हे उदाहरण आहे, असं पंतप्रधानांनी सांगितलं.
काँग्रेसन गरिबांना लुटलं
आपल्याला विकसित भारताच्या निर्मितीसाठी स्वराजसह सुराज्यचा संकल्प पुढं न्यायचा आहे. गरिबांची प्रगती झाली तरच सुराज्यचा संकल्प पुढं नेता येईल. हे फक्त भाजपा आणि महायुती सरकारच पूर्ण करु शकते. काँग्रेस पक्षाकडून प्रत्येक पिढीत गरीबी हटाओ ही खोटी घोषणा दिली जात आहे. गरीबी हटाओ घोषणा देत काँग्रेसनं गरिबांनाच लुटलं, असा आरोप पंतप्रधानांनी केला.
आम्ही गरिबांसाठी अनेक कल्याणकारी योजना सुरु केल्या. त्यामुळे गरिबी आता पुढं जात आहे. देशाला पुढं नेत आहे. या योजनांचा सर्वात मोठा लाभार्थी आमचा दलित, आदिवासी, मागास समाज आहे. महायुती सरकारची नीती ही शोषित आणि वंचितांची ताकद बनत आहे. जी कामं 10 वर्षांमध्ये झाले, ते यापूर्वी देखीाल झाले असते. पण, काँग्रेस सरकारची ती इच्छा नव्हती. त्यामुळेच काँग्रेस गरीब, मध्यमवर्गीयांचं जीवन सुसह्य करण्याच्या योजनांना विरोध करत आहे, असं पंतप्रधान मोदी या भाषणात म्हणाले.
( नक्की वाचा : PM Modi on Reservation : 'सर्वांनी एक राहा, अन्यथा काँग्रेस आरक्षण समाप्त करेल, मोदींचा गंभीर इशारा )
रायगड-पनवेलसाठी योजना
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भाषणात नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यासाठी आगामी काळात होणाऱ्या योजना सांगितल्या. रायगड-पनवेल येत्या दिवसात डेटा-AI चं मोठं केंद्र बनणार आहे. पनवेलमध्ये सेमी कंडक्टर क्षेत्रात मोठी गुंतवणूक होणार आहे. पालघर बंदर आणि JNPT बंदराच्या माध्यमातून विकासाचे नवे रस्ते तयार होतील. त्यामुळे महाराष्ट्रातील तरुणांना रोजगाराच्या मोठ्या संधी मिळतील. पनवेल-रायगडच्या या भागात मोठी सागरी संपत्ती आहे. आमचं सरकार सागरी अर्थव्यवस्था मजबूत करत आहे. मासेमारांसाठी आधुनिक बोटीसंह वेगवेगळ्या योजना सुरु केल्या आहेत. महायुती सरकार महादेव कोळी आणि आग्री समाजासाठी अनेक योजना चालवत आहेत. कोकणात तीन बंदर निर्माण होत आहेत, त्यामुळे देखील सागरी अर्थव्यस्थेला चालना मिळेल, असं ते म्हणाले.
आम्ही देशभर शौचालय तयार केली. काँग्रेसवाले त्याची थट्टा करत होते, पण आज तीच शौचालयं महिलांसाठी इज्जतघर बनली आहेत. उत्तर प्रदेशात त्याला इज्जत घर या नावानं ओखळलं जात आहे. आम्ही 3 कोटी लखपती दीदी करण्याची योजना सुरु केली आहे, असं सांगत पंतप्रधानांनी महिलांसाठीच्या योजना भाषणात सांगितल्या.
( नक्की वाचा : जेंव्हा काँग्रेस अध्यक्षांच्या आईला निजामाच्या सैन्यानी जाळलं, योगींच्या भाषणानंतर जागा झाला इतिहास )
काँग्रेस आणि आघाडीचे पक्ष माझी लाडकी बहीण योजनेलाही विरोध करत आहे. त्यांचे लोकं ही योजना रद्द करण्यासाठी कोर्टातही गेली होती. महिलांच्या भविष्यातील प्रत्येक गोष्टी थांबवण्याची हे वाट पाहात आहेत, अशी टीका पंतप्रधानांनी केली.
अनेक राज्यात काँग्रेसचं अस्तित्व धोक्यात आलं आहे. ते अस्तित्व टिकवण्यसाठी, सत्ता मिळवण्यासाठी काँग्रेस समाजात विष पसरवण्याचं काम करत आहे. SC, ST, OBC घटक पुढे गेला तर काँग्रेस अस्वस्थ होते. मागसवर्ग जातीमध्ये विखुरला जावा, ही काँग्रेसची योजना आहे. दलित, मागास, आदिवासी एक राहिले नाही काँग्रेसच्या खोट्या गोष्टींमुळे भ्रमित झालात तर काँग्रेसला सत्ता स्थापनेची संधी मिळेल. त्यांना संधी मिळाली तर ते आरक्षण संपवेल असं त्यांच्या शहजाद्यांनी ते विदेशात जाहीरपणे सांगितलं आहे, याची आठवण मोदींनी राहुल गांधी यांचं नाव न घेतला करुन दिली. आपण 'एक है तो सेफ है' हे आवाहन त्यांनी सभेत सर्वांना केलं.