आदित्य ठाकरे मुख्यमंत्री? उद्धव यांच्या 'त्या' दाव्याला फडणवीसांकडून उत्तर

शिवसेना नेते आदित्य ठाकरेंच्या (Aditya Thackeray) मुद्यावर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) या दोन माजी मुख्यमंत्र्यांमध्ये सामना रंगला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Devendra Fadnavis Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी केलेल्या गौप्यस्फोटाला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलंय.
अमरावती:

Lok Sabha Elections 2024  लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता रंगात आलाय.  महायुती आणि महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.  शिवसेना नेते आदित्य ठाकरेंच्या (Aditya Thackeray) मुद्यावर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) या दोन माजी मुख्यमंत्र्यांमध्ये आता सामना रंगलाय. 

उद्धव ठाकरे यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीनंतर हा वाद सुरु झालाय. आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी तयार करतो, असं आश्वासन आपल्याला देवेंद्र फडणवीसांनी दिलं होतं, असा दावा उद्धव यांनी या मुलाखतीमध्ये केला होता. अमरावतीमध्ये भाजपा उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारसभेत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा दावा खोडून काढला. त्यांना वेड लागलं असेल मला नाही, असं सांगत फडणवीस यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. 

( नक्की वाचा : महायुतीमधील धुसफूस वाढली, राष्ट्रवादीचाच एक गट अजित पवारांवर नाराज!)

फडणवीसांचं उत्तर

खोटं बोल पण रेटून बोलं अशी विरोधकांची सवय झाली आहे. एकदा खोटं बोलताना मागे बोललेलं खोटं लक्षात ठेवावं लागतं आणि इथेच ते फसतात. उद्धव ठाकरेंचीही अशीच पोलखोल झाली आहे. त्यांनी एका मुलाखतीत म्हटलं आहे की मी आदित्यला मुख्यमंत्रीपदासाठी तयार करणार होतो आणि मी दिल्लीला जाणार होतो. त्यांना वेड लागलं असेल मला नाही.

विरोधक सर्व भ्रमिष्ट झाले आहेत. मला उद्धव ठाकरेंना विचारायचं आहे की, अमित शहांनी बंद खोलीत दिलेलं आश्वासन खरं की मी आदित्यला दिलेलं आश्वासन खरं? आदित्य पुढे जाऊन तुमचा पक्ष चालवणार आहेत, त्यांना निवडणुक लढवू द्या, असं सांगितलं होतं. मी आदित्यला मुख्यमंत्री काय मंत्रीही करणार नव्हतो. आदित्यला मंत्री केल्यानंच त्यांच्या पक्षाची ही हालत झाली आहे. शरद पवारांना मुलीची, सोनिया गांधींना राहुलची आणि उद्धव ठाकरेंना आदित्यची चिंता असते...तुमची चिंता कोणालाच नाही, अशी टीका फडणवीस यांनी या प्रचारसभेत बोलताना केली.

Advertisement

काय म्हणाले होते ठाकरे?

उद्धव ठाकरे यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये मोठा दावा केला होता. मी आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदासाठी तयार करतो आणि स्वत: दिल्लीच्या राजकारणात जातो असा दावा उद्धव यांनी केला होता. त्याचबरोबर अडीच-अडीच वर्षांचं आश्वासन अमित शहा यांनी आपल्याला दिलं होतं, याचा पुनरुच्चारही उद्धव ठाकरे यांनी या मुलाखतीमध्ये केला होता. 
 

Advertisement