Exclusive : 'हे लहान मुलांचं रडगाणं,' उद्धव ठाकरेंच्या आरोपांवर मुख्यमंत्र्यांनी दिलं पहिल्यांदाच उत्तर

CM Eknath Shinde Interview : उद्धव ठाकरे यांनी गेल्या काही दिवसांपासून बॅग तपासणी हा मुद्दा प्रतिष्ठेचा केला आहे. उद्धव ठाकरेंच्या या मुद्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदाच उत्तर दिलंय.

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गेल्या काही दिवसांपासून बॅग तपासणी हा मुद्दा प्रतिष्ठेचा केला आहे. उद्धव ठाकरेंच्या या मुद्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदाच उत्तर दिलंय. 'NDTV मराठी' ला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंचा हा आरोप म्हणजे लहान मुलांचं रडगाणं आहे, असा टोला लगावलाय.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

बॅग तपासणीच्या मुद्यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की,  त्यांच्याकडे काही मुद्दे नाहीत. हा काही मुद्दा आहे का? लोकसभा निवडणुकीच्या काळात माझी बॅग देखील नाशिकमध्ये चेक केली. माझ्या आजही बॅगा चेक केल्या जातात. आम्ही त्याचा व्हिडीओ काढत नाही. कर नाही तर डर कशाला?  हे लहान मुलाचं रडगाणं आहे. इमोशनल कार्ड आता चालत नाही. लोकांना विकासकामं हवी आहेत. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

बटेंगे तो कटेंगाचा अर्थ काय?

योगी आदित्यनाथ यांनी दिलेली 'बटेंगे त कटेंगे' ही घोषणा सध्या चर्चेचा विषय बनली आहे. मुख्यमंत्र्यांनी या घोषणेचा अर्थही मुलाखतीमध्ये सांगितला. क है तो सेफ है या घोषणेचा अर्थ तुम्ही वेगळा काढतायत, लोकशाहीमध्ये लोकांनी एकत्र येऊन एकजुटीनं मतदान केलं पाहिजे. ते मतदान लोकसभेत झाले नाही. मतदान वाढावं म्हणून निवडणूक आयोग देखील काम करतंय. तुम्ही त्याचा अर्थ वेगळा का काढताय मतदान जास्तीत जास्त झालं पाहिजे असा अर्थ का काढत नाही?  असा सवाल मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. 

Advertisement

( नक्की वाचा : Explained : निवडणूक प्रचारात PM मोदी शरद पवारांवर टीका करणे का टाळत आहेत? )

होऊ दे चर्चा 

डीच वर्ष महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये काय झालं याचे तुम्ही साक्षीदार आहात. त्यामुळे आम्ही सांगतो की तुमचा अडीच वर्षांचा कारभार आणि आमचं सव्वा दोन वर्षांचं काम यावर चर्चा होऊ दे. दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ दे. त्यांनी प्रकल्प बंद पाडले. 

कोस्टल रोड, समृद्धी महामार्ग, अटल सेतू, मेट्रो, कारशेड, जलयुक्त शिवार, मराठवाडा वॉटर ग्रीड,सिंचन प्रकल्प अनेक प्रकल्प फक्त अहंकारामुळे बंद पाडले. राज्यकर्त्याला अहंकार नको, अहंकारी राजा असेल, अहंकारी प्रमुख असेल तर राज्याची प्रगती होऊ शकत नाही. आम्ही सत्तेवर आल्यावर ते स्पीड ब्रेकर हटवले, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. 

Advertisement

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणसह अनेक कल्याणकारी योजना केल्या, त्याचा हिशेब आम्ही देऊ. आम्ही रिपोर्टकार्ड सादर केलं. ते सादर करण्यास धाडस लागतं, असं मुख्यमंत्र्यांनी या मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं.  

( नक्की वाचा : जेंव्हा काँग्रेस अध्यक्षांच्या आईला निजामाच्या सैन्यानी जाळलं, योगींच्या भाषणानंतर जागा झाला इतिहास )

खटाखट आणि पटापट

त्यांनी (काँग्रेस) यापूर्वी देखील इतर राज्यांमध्ये फसवणूक केली आहे. त्यांनी योजना जाहीर केल्या आणि नंतर आमच्याकडं पैसे नाहीत असं सांगितलं. इथं महाराष्ट्रात वीज बील माफ करु असं सांगितलं ते केलं नाही. आम्ही फसवणारे नाहीत. जे बोलतो ते करुन दाखवणारे आहोत. 

Advertisement

ते खटखटाखट म्हणाले होते एकही रुपये दिला नाही. आम्ही पटापट पैसे खात्यात जमा केले. आमची नियत साफ आहे. त्यांच्या नियतमध्ये खोट आहे. राजीव गांधी म्हणाले होते एक रुपया केंद्राकडून आला तर 15 पैसे लोकांपर्यंत जातात. मोदीजींकडून एक रुपया आला तर बंदा रुपया लोकांच्या खात्यात जातो. कट, कमिशन आणि करप्शनवर त्यांचा आधार आहे. त्यांचं करप्शन फर्स्ट, आमचं नेशन फर्स्ट, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी विचारलेल्या एका प्रश्नाचं उत्तर देताना सांगितलं. 

आमचा जाहीरनामा चोरला

मविआची पंचसूत्री ही थापासूत्री आहे. त्यांनी आमचंच चोरलं आहे. त्यांनी लाडक्या बहिणींची बदनामी केली. कोर्टात गेले, तिथं स्टे मिळाला नाही. इतकं करुनही आमची लाडकी बहीण योजना सुपरहिट आहे. आमची लाडकी बहीण योजना त्यांनी मान्य केली आहे. आमचा वचननामा त्यांनी चोरला. कॉपी केली आहे. कॉपी करुन पास होता येत नाही. ओरिजनल ते ओरिजन, डुप्लिकेट ते डुप्लिकेट, असं मुख्यमंत्री म्हणाले.