Video : PM मोदींचे कटआऊट निवडणूक आयोगानं हटवले, शिवाजी पार्क परिसरात मोठी कारवाई

PM Modi : शिवाजी पार्कमध्ये होणाऱ्या पंतप्रधानांच्या सभेपूर्वी निवडणूक आयोगानं मोठी कारवाई केलीय.

Advertisement
Read Time: 1 min
मुंबई:

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींची शनिवारी मुंबईतील शिवाजी पार्क मैदानात जाहीर सभा होणार आहे. शिवाजी पार्कमधील नरेंद्र मोदींची सभा होण्यापूर्वी निवडणूक आयोगानं मोठी कारवाई केलीय. शिवाजी पार्क परिसरात लावण्यात आलेले मोदींचे मोठे कटआऊट आयोगानं हटवले आहेत.  शिवाजी पार्क परिसरात लावण्यात आलेले महायुतीचे सर्व अनधिकृत बॅनर्स निवडणूक आयोगाने हटवलेत. मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये हे बॅनर काढण्याची कारवाई आयोगानं केली आहे. 

लोकसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाचा पाचवा टप्पा 20 मे रोजी होणार आहे. सोमवारी होणाऱ्या पाचव्या टप्प्यात मुंबई आणि ठाण्यातील सर्व मतदारसंघांचा समावेश आहे. अनेक दिग्गज नेत्यांचं भवितव्य या टप्प्यात पणाला लागलंय. त्यामुळे प्रचार देखील शिगेला पोहोचलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शनिवारी (17) मुंबईतील शिवाजी पार्क मैदानात सभा होणार आहे. महायुतीच्या प्रचाराची सांगता या सभेच्या माध्यमातून होणार असून त्यामध्ये भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीन्ही पक्षांचे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. 

( नक्की वाचा : सावरकरांचं नाव घेत शिवसेना 'उबाठा'ला आव्हान, कल्याणच्या सभेत मोदी काय म्हणाले? )