जाहिरात

सावरकरांचं नाव घेत शिवसेना 'उबाठा'ला आव्हान, कल्याणच्या सभेत मोदी काय म्हणाले?

PM Modi on Veer Savarkar : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आव्हान दिलं आहे.

सावरकरांचं नाव घेत शिवसेना 'उबाठा'ला आव्हान, कल्याणच्या सभेत मोदी काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कल्याणमध्ये जाहीर सभा झाली.
कल्याण:

PM Modi on Veer Savarkar : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) बुधवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधानांची कल्याणमध्ये जाहीर सभा झाली. महायुतीचे कल्याणचे लोकसभा उमेदवार श्रीकांत शिंदे आणि भिवंडीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारासाठी मोदींनी सभा घेतली. या सभेत पंतप्रधानांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्मरण करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला थेट आव्हान दिलं.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

मोदींनी काय दिलं आव्हान?

'बाळासाहेबांबाबत बोलणारे देखील काँग्रेसचा कुर्ता घेऊन उभे आहेत.  काँग्रेस फुटीरतावादी, दहशतवाद्यांना पाठिंबा देत आहे. नकली शिवसेना त्यांच्यासोबत उभी आहे. काँग्रेसचे लोक छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतात. काँग्रेसच्या शहजाद्यांनी स्टेजवर छत्रपती शिवाजी महाराजांचा कसा तिरस्कार केला हे तुम्ही पाहिले आहे ना? ते चित्र पाहून संपूर्ण महाराष्ट्राला राग आला. पण नकली शिवसेनेनं तोंडाला कुलप लावलं. डोळ्याला पट्टी बांधली, अशी टीका मोदी यांनी केली.

( नक्की वाचा : PM Modi Net Worth : ना घर ना कार... पंतप्रधान मोदींची एकूण संपत्ती किती आहे? )

'काँग्रेसचे शहजादे महाराष्ट्राच्या जमिनीवर वीर सावरकरांचा अपमान करतात. त्यांना खडसावण्याची नकली शिवसेनेत हिंमत नाही. हिंमत असेल तर वीर सावरकारांचा मोठेपणा सांगणारी 5 वाक्य शहजाद्यांना बोलायला लावावीत असं माझं नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादीला आव्हान आहे, असं मोदींनी यावेळी सांगितलं.

( नक्की वाचा : भाजपा 'या' राज्यात मुस्लीम राजाच्या नावावर मतं का मागत आहे? )

काँग्रेस कधीही विकासाचा विचार करु शकत नाही. काँग्रेसला मतांसाठी फक्त हिंदू-मुसलमान करणे माहिती आहे. त्यांची खोटी बाजू मी जनतेसमोर आणलीय. महाराष्ट्रात काँग्रेसचा एकही उमेदवार निवडून येता कामा नये, असं पंतप्रधानांनी यावेळी मतदारांना आवाहन केलं.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: